मराठी बातम्या /बातम्या /religion /शनीच्या अस्तामुळे फेब्रुवारी 2023 हा महिना या पाच राशींना ठरेल प्रतिकूल

शनीच्या अस्तामुळे फेब्रुवारी 2023 हा महिना या पाच राशींना ठरेल प्रतिकूल

फेब्रुवारी महिना बारापैकी पाच राशींसाठी प्रतिकूल असेल.

फेब्रुवारी महिना बारापैकी पाच राशींसाठी प्रतिकूल असेल.

फेब्रुवारी महिना बारापैकी पाच राशींसाठी प्रतिकूल असेल.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 1 फेब्रुवारी:  ज्योतिषशास्त्रानुसार, 2023च्या फेब्रुवारी महिन्यात काही ग्रह राशिपरिवर्तन करणार आहेत. या गोचर भ्रमणाचा काही राशींवर प्रतिकूल, तर काही राशींवर अनुकूल परिणाम होईल. 31 जानेवारीला शनीचा कुंभ राशीत अस्त होत आहे. फेब्रुवारी महिना बारापैकी पाच राशींसाठी प्रतिकूल असेल. ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम यांनी सांगितलं, 31 जानेवारीला कुंभ राशीत शनीचा अस्त होत आहे. त्यामुळे पाच राशींसाठी फेब्रुवारी महिना आव्हानात्मक असेल. या पाच राशी कोणत्या ते जाणून घेऊ या.

  कुंभ : कुंभ राशीच्या व्यक्तींनी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावं. हा महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. उद्योग-व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आव्हानात्मक स्थिती कायम राहील.

  साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी करा हे 10 सोपे उपाय

  तूळ : या राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना अनेक अडचणींचा असेल. कार क्षेत्रात काम करणाऱ्यांचं कामात मन रमणार नाही. या राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यात संघर्ष करावा लागू शकतो. याशिवाय कुटुंबात सुसंवादाचा अभाव राहील.

  मिथुन : मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना अडचणींचा ठरेल. कौटुंबिक जीवनात सावध आणि समजूतदार राहावं लागेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.

  कर्क : फेब्रुवारी महिन्यात कर्क राशीच्या व्यक्तींना व्यवसायात तोटा सहन करावा लागू शकतो. कुटुंबात वाद-विवाद होऊ शकतात. प्रतिकूल परिस्थितीत शहाणपणाने वागण्याची गरज आहे.

  सिंह : या राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यात नोकरीच्या ठिकाणी दबावाचा सामना करावा लागू शकतो. तसंच नुकसान आणि धनहानी होऊ शकते. व्यवसायात प्रगतीपासून वंचित राहू शकाल.

  स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी

  हे आहेत उपाय

  ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, `या राशींच्या जातकांनी सावधगिरी बाळगून आपली कामं पूर्ण करावीत. शनी अनुकूल कसा राहील याकडे लक्ष द्यावं. अन्यथा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी सुंदरकांड, हनुमान चालिसा आणि शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा. तसंच शनिवारी सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ घालून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावं. संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.`

  या मंत्रांचा करा जप

  ॐ शं शनिश्चराय नम: अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया।

  दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर।।

  गतं पापं गतं दु:खं गतं दारिद्र्यमेव च।

  आगता: सुख-संपत्ति पुण्यांश्च तव दर्शनात्।।

  ॐ त्र्यंम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम्।

  उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।

  ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये।

  शंयोरभिश्रवन्तु नः। ॐ शं शनैश्चराय नमः।।

  ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌।

  छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम्‌।।

  (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion