मराठी बातम्या /बातम्या /religion /

काजळ आणि सुरम्यानं होते शनीची साडेसाती दूर; फायदे एकदा नीट वाचा

काजळ आणि सुरम्यानं होते शनीची साडेसाती दूर; फायदे एकदा नीट वाचा

काजळ आणि सुरमा

काजळ आणि सुरमा

ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने बोलायचं झालं, तर काजळ आणि सुरमा ही सौंदर्यप्रसाधनं शनी, राहू आणि केतू यांच्याशी संबंधित मानली जातात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 डिसेंबर : सध्या विज्ञानाचं युग आहे. मानवाने विज्ञानाच्या आधारे इतकी प्रगती केली आहे, की आपण थेट सूर्याच्या वातावरणातदेखील जाऊन पोहोचलो आहोत; मात्र तरीदेखील कधी ना कधी आपल्याला भविष्य, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवावासा वाटतो. काही जण तर आपल्या दिवसाची सुरुवातच राशिभविष्य वाचून करतात. आपला दिवस कसा जाईल, ही उत्सुकता त्यामागे असते. ज्या व्यक्ती राशिभविष्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने बोलायचं झालं, तर काजळ आणि सुरमा ही सौंदर्यप्रसाधनं शनी, राहू आणि केतू यांच्याशी संबंधित मानली जातात. त्यामुळे शनी, राहू आणि केतूशी संबंधित दोष असल्यास काजळ आणि सुरमा वापरून उपाय करता येतात. त्याचबरोबर इतर अनेक प्रकारची संकटंही त्यांच्याद्वारे टाळता येतात.

शनी, राहू-केतूचा प्रभाव

मंगळवार आणि शनिवारी डोळ्यांना सुरमा लावला पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत मंगळाची दशा चांगली नसल्यास शनी, राहू आणि केतूचे दोषही वाढतात. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी दररोज 40 दिवस डोळ्यांवर पांढरा सुरमा लावला पाहिजे.

हेही वाचा -  Chanakya Niti : 'ही' एक चूक तुमच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर फिरवू शकते पाणी...

साडेसाती

शनीची साडेसाती राहू नये यासाठीही सुरमा वापरून उपाय करता येतात. एका कुपीमध्ये काळा सुरमा घेऊन ज्या व्यक्तीला साडेसाती सुरू आहे तिच्या डोक्यापासून पायापर्यंत नऊ वेळा फिरवलं पाहिजे. यानंतर, ही कुपी (काचेची लहान बाटली) अज्ञात ठिकाणी जमिनीत गाडून टाकावी. यानंतर घरी जाताना मागे वळून पाहू नका. हे शनिवारी केलं पाहिजे. असं केल्याने शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो, असं म्हटलं जातं.

नोकरी

अनेकांना नोकरी मिळण्यात किंवा मिळालेल्या नोकरीच्या ठिकाणी अडचणी असतात. 5 ग्रॅम किंवा त्याहून अधिक काजळ शनिवारी निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाकल्यास नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात, असं म्हटलं जातं.

हेही वाचा -  9 ग्रहांचे आशीर्वाद मिळण्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? इथं वाचा

मंगळाची दशा

ज्योतिषशास्त्रानुसार, रोज हनुमान चालिसा पठण करण्यासोबतच डोळ्यांमध्ये पांढऱ्या रंगाचा सुरमा लावल्यास राशीतली मंगळाची अशुभ दशा दूर होईल. त्याचबरोबर शनी, राहू आणि केतूचे दोषही संपतील.

साधारणपणे, डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि डोळ्यांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी काजळाचा आणि सुरम्याचा वापर केला जातो; मात्र ज्योतिषशास्त्रामध्येही त्यांना महत्त्व आहे.

First published:

Tags: Astrology and horoscope