मराठी बातम्या /बातम्या /religion /

Astro Tips : घरात काळ्या आणि लाल मुंग्या येण्याचा काय असतो अर्थ? हे शुभ की अशुभ

Astro Tips : घरात काळ्या आणि लाल मुंग्या येण्याचा काय असतो अर्थ? हे शुभ की अशुभ

प्रत्येकाच्या घरी मुंग्या येतात. जंक फूड किंवा खाद्यपदार्थ घरात पडलेले असले तर मुंग्या आपोआपच ते खाण्यासाठी येतात. परंतु अनेकवेळा असे घडते की घराच्या त्या ठिकाणी मुंग्या दिसू लागतात, जिथे खूप स्वच्छता असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 27 सप्टेंबर : घरात मुंग्या दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे, त्यामुळे अनेकदा आपण सामान्य घटना म्हणून याकडे दुर्लक्ष करतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मुंग्या शुभ आणि अशुभ घटनाही सांगतात. ज्योतिष शास्त्रानुसार घरात मुंग्याचे येणे केवळ तुमची आर्थिक स्थितीच दर्शवत नाहीत तर भविष्यात होणाऱ्या नुकसानीचीही माहिती देते.

मुंग्या अनेकदा ओल्या जागेतून बाहेर येताना दिसतात. भोपाळचे ज्योतिषी विनोद सोनी पोद्दार यांच्याकडून जाणून घेऊया मुंग्यांपासून मिळणारे शुभ आणि अशुभ संकेत. मुंग्या तूप खात नाहीत ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे, तरीही त्या तुपाच्या भांड्यात दिसतात. जिथं साफसफाई केली आहे, जिथं किंचितही घाण नाही, तिथंही मुंग्या दिसू लागतात. हे का घडते? यामागे काही चिन्ह आहे का? हेदेखील जाणून घेऊया.

Vastu Tips : मोरपंखाच्या या साध्या सोप्या उपायाने होईल धनलाभ, हातात टिकेल पैसा

घरात लाल मुंग्या येण्याचा अर्थ

घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या तर समजा आर्थिक संकट येत आहे. कुठेतरी नुकसान होणार आहे. अचानक अशी काही गरज निर्माण होते, ज्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. लाल मुंग्या अनावश्यक कर्ज दर्शवतात. मुंग्यांच्या माध्यमातून शनि देव आपल्याला अशा प्रकारचे संकेत देत असतात. जेणेकरून तुम्ही आधीच काळजी घ्यावी, परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे आणि सतर्क रहावे.

लाल मुंग्यासाठी उपाय

बहुतेक लोकांना माहित आहे की लाल मुंग्या हानिकारक आहेत. ती कर्जाची खूण देते, म्हणून लोक लाल मुंगीला पाहताच मारतात, पण तसे करू नये. जर तुम्ही धार्मिक व्यक्ती असाल आणि तुमच्या इष्टावर श्रद्धा असेल तर त्यांच्या संकेताने येणाऱ्या मुंग्यांना तुम्ही मारू नका. त्यांना दूर करण्यासाठी मुंग्या येत असलेल्या ठिकाणी लिंबू, तमालपत्र, काळी मिरी किंवा लवंगा ठेवा. या पद्धतीमुळे मुंग्यांना समजते की तुम्हाला सिग्नल मिळाला आहे आणि त्या परत जातात.

काळ्या मुग्या घरात येण्याचा अर्थ

घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर ते शुभ लक्षण आहे. तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे. असा कोणताही बदल, जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल. हे तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंग्यांना असेच येऊ द्यावे किंवा त्यांना आमंत्रित करावे.

काही झालं तरी या दिवशी यश निश्चित मिळणार; तुमच्यासाठी कोणता दिवस लकी इथं पाहा

काळ्या मुंग्यावर उपाय

काळ्या मुंग्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत आहे हे स्पष्टपणे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्यासमोर पीठ टाकावे. असे केल्याने तुमच्या इष्टदेवाला कळेल की तुमच्यापर्यंत सिग्नल पोहोचला आहे. मग मुंग्या आपोआप परत जातील.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Religion