Rahu-Ketu : कुंडलीत राहु-केतू दोष असेल तर बिघडतंय सगळंच; हे उपाय त्यासाठी करून बघा

Rahu-Ketu : कुंडलीत राहु-केतू दोष असेल तर बिघडतंय सगळंच; हे उपाय त्यासाठी करून बघा

राहू आणि केतू फक्त वाईट परिणाम देतात असे नाही. राहू आणि केतू हे ग्रह काही लोकांच्या कुंडलीत शुभ फळही देतात. जाणून घेऊया राहू आणि केतू ग्रहांच्या शांतीसाठी आपण कोणते उपाय करू शकतो.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीचा माणसाच्या जीवनावर आणि आचरणावर मोठा प्रभाव पडतो. प्रत्येक ग्रह कुंडलीतील व्यक्तीच्या घरानुसार शुभ-अशुभ फळ देतो. ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा आपल्याला राहू आणि केतू या दोन ग्रहांबद्दल सांगत आहेत. या दोन ग्रहांच्या स्थितीमुळे सामान्य माणूस नेहमीच चिंतेत असतो. हे दोन्ही ग्रह ब्रह्मांडात प्रत्यक्ष दिसत नसले तरी त्यांचा प्रभाव व्यक्तीच्या कुंडलीवर खूप व्यापक असतो. जर हा ग्रह व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य किंवा चंद्रासोबत बसला असेल तर सूर्य ग्रहण दोष किंवा चंद्र ग्रहण दोष होऊ (Rahu-Ketu Upay) शकतो.

राहू आणि केतू फक्त वाईट परिणाम देतात असे नाही. राहू आणि केतू हे ग्रह काही लोकांच्या कुंडलीत शुभ फळही देतात. जाणून घेऊया राहू आणि केतू ग्रहांच्या शांतीसाठी आपण कोणते उपाय करू शकतो.

राहूचा वाईट प्रभाव -

एखाद्या व्यक्तीसोबत अचानक कोणतीही घटना घडली तर ती राहूच्या योगामुळेच झालेली असू शकते. याशिवाय भयावह, भीतीदायक स्वप्ने पडणे, झोपेत अचानक घाबरून उठणे ही राहूच्या वाईट प्रभावाची लक्षणे मानली जातात. अचानक शरीरात जडपणा आला किंवा मनावर अनावश्यक ताण जाणवत असेल तर या सगळ्याचे कारण राहु असण्याची शक्यता दाट असते.

राहूचा चांगला प्रभाव -

कुंडलीत राहूच्या सकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीला अमाप संपत्ती मिळते. तसेच अशा लोकांची कल्पनाशक्ती तीक्ष्ण असते. राहु कुंडलीत चांगला असेल तर व्यक्ती साहित्यिक, तत्त्वज्ञ, वैज्ञानिक बनू शकते. राहूच्या संयोगाने लोक सहसा पोलीस किंवा प्रशासकीय जबाबदाऱ्या हाताळतात.

केतूचा वाईट प्रभाव -

कुंडलीत केतू ग्रहाचा प्रभाव नकारात्मक असेल तर व्यक्तीची झोपही खराब होते. कुटुंबात अनावश्यक पैसा खर्च होतो. या ग्रहाच्या प्रभावामुळे सांधेदुखी, बाळंतपणात अडथळा आणि घरगुती वादही होतात. याशिवाय कुंडलीत केतूच्या अशुभ स्थितीमुळे मुलांशी संबंधित समस्या निर्माण होतात.

केतूचा चांगला प्रभाव -

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केतू लाभदायक असेल तर अशा स्थितीत तो व्यक्तीला पद, मान, प्रतिष्ठा आणि संतती सुख देतो. याशिवाय केतूच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे मनोबल आणि दर्जा नेहमी टिकून राहते.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

राहू-केतूसाठी उपाय -

1. हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिष शास्त्रामध्ये राहू-केतूच्या शांतीसाठी अनेक उपाय सांगितले आहेत, परंतु या सर्व उपायांपैकी सर्वात सोपा उपाय म्हणजे दिवसभराचे व्रत. राहु आणि केतू ग्रहांच्या शांतीसाठी 18 शनिवारपर्यंत अखंड व्रत करण्याचा नियम आहे.

2. राहूचे व्रत पाळण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून राहूचा मंत्र “ऊं भ्रां भ्रीं भ्रौं स: राहवे नम:” मंत्र और केतु की शांति के लिए “ऊं स्त्रां स्त्रीं स्त्रौं स: केतवे नम:” या मंत्राचा 18, 11 किंवा 5 माळा जप करा. असे केल्याने आपल्याला लवकरच सकारात्मक परिणाम दिसून येतील.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 5, 2022, 7:00 PM IST

ताज्या बातम्या