मराठी बातम्या /बातम्या /religion /

Astro Tips : मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? या ग्रहाचा असू शकतो प्रभाव, करा हे सोपे उपाय

Astro Tips : मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? या ग्रहाचा असू शकतो प्रभाव, करा हे सोपे उपाय

मानवी बुद्धिमत्ता बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, जे मनुष्याला ज्ञानी आणि बुद्धिमान बनवते. जर बुध ग्रह कमजोर असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

मानवी बुद्धिमत्ता बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, जे मनुष्याला ज्ञानी आणि बुद्धिमान बनवते. जर बुध ग्रह कमजोर असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

मानवी बुद्धिमत्ता बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, जे मनुष्याला ज्ञानी आणि बुद्धिमान बनवते. जर बुध ग्रह कमजोर असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 22 सप्टेंबर : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि बुद्धिमत्ता ग्रह आणि नक्षत्रांशी संबंधित आहे. चंद्र आणि बुध ग्रह यांचा संबंध मनुष्याच्या एकाग्रतेशी आहे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. चंद्राचा मनावर परिणाम होतो. तर बुध ग्रहा बुद्धीला. सर्व सुखसोयी मिळूनही काही मुले अभ्यासात कमकुवत असल्याचे अनेकदा दिसून येते. ज्योतिष शास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासातील कमजोरीसाठी हे ग्रह कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. कुंडलीतील या ग्रहांच्या दोषाचा प्रभाव व्यक्तीच्या शैक्षणिक स्तरावर आणि करिअरमध्ये अपयशी ठरतो. या ग्रहांच्या दोषामुळे मुलांची एकाग्रता भंग होते आणि त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. भोपाळमध्ये राहणारे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

Vastu: सतत अभ्यासात मागे राहतंय मुल; वास्तूनुसार अभ्यासाच्या खोलीत करा असे बदल

बुध ग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्राचे असे मत आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत बुध ग्रह सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात स्थित असतो आणि त्यावर गुरुची दृष्टी असते. तेव्हा त्या व्यक्तीच्या शिक्षणात अनेक समस्या येतात आणि त्यांचे शिक्षण अपूर्ण राहण्याची भीती कायम राहाते. एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करूनही करिअरमध्ये चांगले स्थान मिळवू शकत नाही. चंद्राचा प्रभाव चंद्राचा मनावर परिणाम होतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. याशिवाय चंद्राचा संबंध शिक्षणाशी आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र दोष असेल तर त्या व्यक्तीला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु ज्या घरामध्ये जन्म कुंडलीत चंद्र बसला असेल त्या घरामध्ये गुरु ग्रह दिसत असेल तर त्याचे परिणाम फारसे वाईट नसतात.

कामावर नेहमी बॉसचा ओरडा खातात या राशीचे लोक, असा करा उपाय

या दोषांवर करा हे सोपे उपाय - ज्योतिषशास्त्रात या ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. - सकाळी उठल्यावर तुळशीच्या पानांचे सेवन करावे आणि “ओम ऊँ सरस्वताय नमः” चा जप करावा. - दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. - एकाग्रता सुधारण्यासाठी पन्ना रत्न घाला, परंतु विद्वान ज्योतिषाचा सल्ला घ्या. - सूर्यदेवाला जल अर्पण करा. हिरव्या भाज्या आणि सॅलड्स खा. - रोज सकाळी गायत्री मंत्राचा जप करा. - हिरवे कपडे घाला. सकाळी आंघोळीनंतर कपाळ, कंठ आणि छातीवर पिवळे चंदन लावा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Parents and child, Religion, School student

पुढील बातम्या