मराठी बातम्या /बातम्या /religion /

Astro Tips: काळी मांजर दिसणे शुभ असतं की अशुभ, रस्त्यात आडवे जाण्याचा अर्थ काय?

Astro Tips: काळी मांजर दिसणे शुभ असतं की अशुभ, रस्त्यात आडवे जाण्याचा अर्थ काय?

आपल्या सर्वांच्या घरात प्राचीन काळापासून अनेक समजुती प्रचलित आहेत. ज्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते. या गोष्टींवर आपला विश्वास बसत नसला तरी मनात कुठेतरी एक भीती कायम असते. काळे मांजर दिसणे, कुठेतरी जाताना मांजराचा रस्त्यातून आडवे जाणे, घराभोवती मांजराचे रडणे इ.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 सप्टेंबर : सनातन धर्मात काही श्रद्धा-मान्यता आहेत, ज्या आपल्याला आगामी काळात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात. त्याचप्रमाणे मांजराबाबतही अनेक समजुती-मान्यता आहेत. मांजर पाहणे, मांजर रस्त्यातून आडवे जाणे अशुभ असते, असे अनेकदा ज्येष्ठांकडून ऐकायला मिळते. घराभोवती मांजरीचे रडणे हे सुद्धा काही अप्रिय घटनेचे लक्षण मानले जाते. परंतु, मांजर दिसल्यावर अशा कही गोष्टी आहेत ज्या शुभ परिणाम दर्शवतात. या संदर्भात अधिक माहिती भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्रकुमार शर्मा देत आहेत. मांजरीचे घरामध्ये वारंवार येणे धार्मिक शास्त्रांमध्ये अशुभ मानले गेले असले तरी शकुन शास्त्रामध्ये काळ्या मांजरीशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगण्यात आले आहेत. कुठेही जाताना काळी मांजर डावीकडून उजवीकडे वाट ओलांडत असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते. याशिवाय घरात कुठेतरी मांजर शौच करत असेल, तर तेथे काही अनुचित प्रकार घडण्याची चिन्हे आहे. स्वप्नात काळी मांजर - जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काळी मांजर दिसली तर याचा अर्थ असा होतो की, आगामी काळात तुमचे मोठे नुकसान होणार आहे. तर कधी-कधी काळे मांजर स्वप्नात दिसणे देखील धन लाभाचे संकेत देते. जर तुम्हाला पहाटेच्या वेळीस काळे मांजर दिसले तर याचा अर्थ असा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत किंवा तुम्ही जुन्या मित्राला भेटणार आहात. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं स्वप्नात काळ्या मांजरीचा हल्ला - जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात काळी मांजर स्वतःवर किंवा इतर कोणावर हल्ला करताना दिसली तर ते खूप अशुभ लक्षण मानले जाते. दुसरीकडे, जर काळी मांजर गुपचूप तुमच्या घरी परत आली तर ते शुभ चिन्ह मानले जाते. जर काळी मांजर एकमेकांशी भांडताना दिसली तर हे तुमच्या घरात कौटुंबिक भांडणाचे लक्षण आहे. जर काळी मांजर आपल्याकडून उजवीकडे एक सारखी चालत जाताना दिसली तर ते शुभ चिन्ह मानले जाते. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या