मराठी बातम्या /बातम्या /religion /

Kubera Mantra: पूजेवेळी अष्टलक्ष्मी कुबेर मंत्राचा असा करा जप; पैसा, बँक बॅलन्स नेहमीच जाईल वाढत

Kubera Mantra: पूजेवेळी अष्टलक्ष्मी कुबेर मंत्राचा असा करा जप; पैसा, बँक बॅलन्स नेहमीच जाईल वाढत

भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता म्हटले जाते. देवी लक्ष्मीसोबत कुबेराची पूजा केल्यास आयुष्यभर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. कुबेराची पूजा करण्याची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 12 ऑगस्ट : भगवान कुबेर हे संपत्ती, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. भगवान कुबेर यांना 'यक्षांचा राजा' आणि 'देवांचा खजिना' म्हणूनही ओळखले जाते. यामुळेच दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत कुबेर यांची पूजा केली जाते. भक्तांच्या प्रार्थनेने कुबेर त्यांच्यावर प्रसन्न (Ashtalakshmi Kubera Mantra) होतात. कुबेर मंत्राचा जप केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घर धन-समृद्धीने भरते. जाणून घेऊया पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या कुबेर मंत्राच्या उपायाबद्दल. कुबेर मंत्राचा जप करण्याचे महत्त्व - भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता म्हटले जाते. देवी लक्ष्मीसोबत कुबेराची पूजा केल्यास आयुष्यभर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. कुबेर मंत्राचा जप केल्याने अपार धन आणि ऐश्वर्य प्राप्त होते. ज्योतिषांच्या मते, कुबेर मंत्राचा जप केल्याने भगवान कुबेराची कृपा प्राप्त होते. यामुळे कुटुंबात धन, समृद्धी आणि सुखाचा वास राहील. अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र जप पद्धत - सकाळी आंघोळ करून पूजेचे ठिकाण तयार करावे. चौरंगावर लाल कापड पसरवून गंगाजल शिंपडा. चौरंगावर महालक्ष्मी आणि श्री कुबेर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. यानंतर तुपाचा दिवा, धूप आणि अगरबत्ती लावा. मूर्तीला फुले अर्पण करून लाल कुंकवाचा टिळा लावावा. यानंतर उजव्या हातात 108 मण्यांची माळ घेऊन नामजप सुरू करा. खालील मंत्राचा जप करावा. हे वाचा - बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा ‘ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥’ या गोष्टी लक्षात ठेवा - या मंत्राचा जप केल्यानंतर सर्व संकटे दूर करण्यासाठी हात जोडून देवाला प्रार्थना करा. कुटुंबाची आर्थिक उन्नती करा, अशी मनोभावे मागणी करा. यानंतर कुटुंबासह देवी लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची आरती करावी. शेवटी त्यांना नमस्कार करावा. हे वाचा - तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? 'या' 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या