मराठी बातम्या /बातम्या /religion /एप्रिल महिन्यात सण-वारांना नाही तोटा; संपूर्ण महिन्यात पहा कधी आहेत कोणते सण

एप्रिल महिन्यात सण-वारांना नाही तोटा; संपूर्ण महिन्यात पहा कधी आहेत कोणते सण

एप्रिल 2023 महिन्यातील सण-उत्सव

एप्रिल 2023 महिन्यातील सण-उत्सव

एप्रिलमध्ये सूर्याची मेष संक्रांती आहे. सूर्य मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा नवीन सौर वर्ष सुरू होईल. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांना एप्रिलचे मुख्य व्रत आणि सण याविषयी माहिती दिली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 एप्रिल : एप्रिल 2023 महिना सुरू झाला आहे. व्रत-उपासनेच्या दृष्टिकोनातून हा महिना खूप महत्त्वाचा आहे. एप्रिलमध्ये हिंदू धर्माबरोबरच मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे सणही येणार आहेत. एप्रिलमध्ये कामदा एकादशी झाली आता हनुमान जयंती, गुड फ्रायडे, अक्षय्य तृतीया, ईद, शिवरात्री, प्रदोष, अमावस्या आणि पौर्णिमा यासारखे उपवास आणि सण येत आहेत. एप्रिलमध्ये सूर्याची मेष संक्रांती आहे. सूर्य मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा नवीन सौर वर्ष सुरू होईल. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांना एप्रिलचे मुख्य व्रत आणि सण याविषयी माहिती दिली आहे.

एप्रिल 2023 उपवास आणि सण -

1 एप्रिल, दिवस: शनिवार: कामदा एकादशी

3 एप्रिल, दिवस: सोमवार: सोम प्रदोष व्रत

4 एप्रिल, दिवस: मंगळवार: महावीर जयंती

6 एप्रिल, दिवस: गुरुवार: हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा स्नान दान

7 एप्रिल, दिवस: शुक्रवार: गुड फ्रायडे

9 एप्रिल, दिवस: रविवार: संकष्टी चतुर्थी

14 एप्रिल, दिवस: शुक्रवार: मेष संक्रांती, सूर्य संक्रमण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

16 एप्रिल, दिवस: रविवार: वरुथिनी एकादशी

17 एप्रिल, दिवस: सोमवार: सोम प्रदोष व्रत

18 एप्रिल, दिवस: मंगळवार: स्वामी समर्थ पुण्यतिथी, मासिक शिवरात्री

20 एप्रिल, दिवस: गुरुवार: चैत्र अमावस्या

22 एप्रिल, दिवस: शनिवार: परशुराम जयंती, ईद, अक्षय्य तृतीया

23 एप्रिल, दिवस: रविवार: वैशाख विनायक चतुर्थी

29 एप्रिल, दिवस: शनिवार: सीता नवमी

हनुमान जयंती 2023: हनुमान जयंती 6 एप्रिल रोजी आहे. हा दिवस चैत्र पौर्णिमा आहे. या तिथीला हनुमानाचा जन्म झाला, म्हणून दरवर्षी या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते.

गुड फ्रायडे 2023: या वर्षी गुड फ्रायडे 7 एप्रिल रोजी आहे. या दिवशी ख्रिश्चन धर्माचे लोक येशू ख्रिस्ताचे स्मरण करतात. या दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या प्राणाचा त्याग केला. मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

हे वाचा - मंदोदरीला सीतेची माता का म्हटले जाते? या धार्मिक ग्रथांमध्ये सांगितलंय रहस्य

अक्षय्य तृतीया 2023: यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल रोजी आहे. अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण काळ अबुझा मुहूर्त असतो. अक्षय्य तृतीयेला लग्न किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यांसाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. या दिवशी सोने, दागिने, वाहन, घर इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते.

ईद 2023: मुस्लिम समाजातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे ईद, ज्याला ईद उल फित्र असेही म्हणतात. यंदा ईद 22 एप्रिलला आहे. मुस्लिम लोक ईदच्या दिवशी नमाज अदा करतात, एकमेकांना मिठी मारतात आणि शुभेच्छा देतात.

हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Religion