मराठी बातम्या /बातम्या /religion /

Angarki Sankshati Chaturthi 2022 : शहरानुसार बदलतो चंद्रोदयाचा मुहूर्त, पाहा संकष्टी चतुर्थीला तुमच्या शहरात कधी होईल चंद्रोदय

Angarki Sankshati Chaturthi 2022 : शहरानुसार बदलतो चंद्रोदयाचा मुहूर्त, पाहा संकष्टी चतुर्थीला तुमच्या शहरात कधी होईल चंद्रोदय

गणपती बाप्पा हे शुभतेचे प्रतिक असून अशुभ काळातील अडथळे, कामातील अडथळे दूर करणारे आद्य दैवत आहे. आज आपण यादिवशी चंद्रोदयाची वेळ कोणती आहे ते याबद्दल माहिती घेणार आहोत.

गणपती बाप्पा हे शुभतेचे प्रतिक असून अशुभ काळातील अडथळे, कामातील अडथळे दूर करणारे आद्य दैवत आहे. आज आपण यादिवशी चंद्रोदयाची वेळ कोणती आहे ते याबद्दल माहिती घेणार आहोत.

गणपती बाप्पा हे शुभतेचे प्रतिक असून अशुभ काळातील अडथळे, कामातील अडथळे दूर करणारे आद्य दैवत आहे. आज आपण यादिवशी चंद्रोदयाची वेळ कोणती आहे ते याबद्दल माहिती घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 12 सप्टेंबर : मंगळवारी 13 सप्टेंबर रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते. अंगारक संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्याने संकट दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. गणपतीच्या कृपेने जीवनात शुभ आणि सौभाग्य वाढते.गणपती बाप्पा हे शुभतेचे प्रतिक असून अशुभ काळातील अडथळे, कामातील अडथळे दूर करणारे आद्य दैवत आहे. मंगळवारी अंगारक चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. त्यामुळे राज्यात कोणत्या शहरात किती वाजता चंद्रोदय होणार आहे याबद्दल आम्ही तुम्हाला येथे माहिती देत आहोत.

अंगारक संकष्ट चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 13 सप्टेंबर रोजी (मंगळवार) सकाळी 10.37 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10.23 वाजता समाप्त होईल. चतुर्थीची पूजा आणि व्रत तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा चतुर्थी तिथीलाच रात्री चंद्राची पूजा केली जाते.

Angarki Sankshati Chaturthi 2022 : अंगारकी चतुर्थीचं महत्व माहितीय? याचे नियम आणि पूजा पद्धती, वाचा सविस्तर

यावेळी संकष्टी चतुर्थीतील चंद्रोदयाचा मुहूर्त रात्री 08:26 वाजता होईल. जे व्रत करतात त्यांनी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा करून त्यांना जल अर्पण करावे. त्यानंतर नियमानुसार उपवास पूर्ण करावा. मात्र चंद्रोदयाच्या मुहूर्त शहरांनुसार बदलतो. वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. महाराष्ट्रातील काही मुख्य शहरांमधील चंद्रोदयाचे मुहूर्त खाली दिलेले आहेत.

मुंबई - रात्री 8.52 वाजता

ठाणे - रात्री 8.51 वाजता

पुणे - रात्री 8.48 वाजता

रत्नागिरी - रात्री 8.52 वाजता

कोल्हापूर - रात्री 8.48 वाजता

सातारा - रात्री 8.48 वाजता

अहमदनगर - रात्री 8.44 वाजता

नाशिक - रात्री 8.47 वाजता

धुळे - रात्री 8.42 वाजता

जळगाव - रात्री 8.39वाजता

भुसावळ - रात्री 8.38 वाजता

सांगली - रात्री 8.47 वाजता

सोलापूर - रात्री 8.40 वाजता

नागपूर - रात्री 8.24 वाजता

भंडारा - रात्री 8.22 वाजता

गणपती गेले गावाला..! पण तुम्हाला असे स्वप्नात दिसतात; त्याचा काय असतो अर्थ?

चंद्रपूर - रात्री 8.24 वाजता

अमरावती - रात्री 8.30 वाजता

यवतमाळ - रात्री 8.29 वाजता

वर्धा - रात्री 8.27 वाजता

अकोला - रात्री 8.33 वाजता

बुलढाणा - रात्री 8.27 वाजता

औरंगाबाद - रात्री 8.41 वाजता

परभणी - रात्री 8.35 वाजता

बीड - रात्री 8.40 वाजता

नांदेड - रात्री 8.33 वाजता

उस्मानाबाद - रात्री 8.39 वाजता

First published:

Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi, Lifestyle