नवी दिल्ली, 29 मार्च : हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. अबूझ मुहूर्तामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेचा पवित्र सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी, अक्षय तृतीया हा सण शनिवार, 22 एप्रिल 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. या पवित्र दिवशी स्नान, दान, धर्म आणि कर्म यांचे महत्त्व खूप आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी. असे मानले जाते की या दिवशी काही गोष्टी केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते, त्याविषयी (Akshaya Tritiya 2023) जाणून घेऊया.
घरात स्वच्छता ठेवा-
अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी. असे मानले जाते की या दिवशी घरात गंगाजल शिंपडावे. धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात स्वच्छतेची काळजी घेतली जाते त्याच घरात देवी लक्ष्मीचा वास असतो.
भांडण करू नका -
अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवा किंवा घरात भांडण होऊ देऊ नका. असे म्हटले जाते, ज्या घरात अशांतता असते त्या घरात माता लक्ष्मी राहत नाही. ज्या घरात चांगले वातावरण असते, जिथे कुटुंबातील सदस्य प्रेमाने राहतात त्या घरात देवी लक्ष्मी वास करते.
सात्विक अन्न खा -
अक्षय तृतीयेच्या दिवशी सात्विक भोजन करावे. या दिवशी भोजन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य अवश्य अर्पण करा. अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तामसिक अन्न, मांस व मद्य सेवन करू नये. तुम्ही तुमच्या प्रमुख देवतेची पूजा करावी.
हे वाचा - भारतातले सगळ्यात श्रीमंत बाबा, पहिल्या क्रमांकाचं नाव वाचून बसेल धक्का!
चुकीची-अनैतिक कामं करू नका -
अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी नेहमी चुकीच्या कामांपासून लांब राहावे. धार्मिक प्रथांनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकीचे कर्म करणाऱ्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या दिवशी गरीब आणि गरजूंना मदत करा. या दिवशी क्षमतेनुसार दान करावे.
हे वाचा - Akshay Tritiya 2023:साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेला का आहे विशेष महत्त्व?
(सूचना: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshaya Tritiya 2023, Religion