मुंबई, 22 मे: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे? याचा उल्लेख अनेक वास्तु ग्रंथात आढळतो. भवन भास्कर आणि विश्वकर्मा प्रकाशसहित इतर ग्रंथांमध्येही याबद्दल माहिती आढळते. वास्तूनुसार आदर्श घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा. दुसरीकडे, तुमच्या घराचा उतार पूर्व, उत्तर किंवा पूर्व-उत्तर (ईशान्य कोन) दिशेला असणे शुभ मानले जाते. अशाप्रकारे वास्तूनुसार घरातील खोल्या, हॉल, स्वयंपाकघर, स्नानगृह आणि शयनकक्ष एका विशिष्ट दिशेला असावेत. यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात.
पूर्व दिशा
पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा. या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात. घराचे मुख्य दार या दिशेला असेल तर ते खूप चांगले असते. आपण खिडकीदेखील ठेवू शकता.
पश्चिम दिशा
तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशेला असावे. लक्षात ठेवा की स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ नसावेत.
उत्तर दिशा
घरामध्ये या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत. घराची बाल्कनी आणि वॉश बेसिनही याच दिशेने असावे. मुख्य दार या दिशेला असल्यास आणखी चांगले.
दक्षिण दिशा
दक्षिण दिशेला कोणत्याही प्रकारची मोकळी जागा, शौचालय इत्यादी असू नये. जड वस्तू घरात या ठिकाणी ठेवा. या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे घरातील त्रास वाढतो.
प्रेमात सहसा अयशस्वी होतात या राशी, रिलेशनशिपवरून कायम असतात संभ्रमात
उत्तर-पूर्व दिशा
याला ईशान्य दिशा असेही म्हणतात. ही दिशा म्हणजे पाण्याचे ठिकाण. या दिशेला पाण्याचा बोर, जलतरण तलाव, पूजास्थान इत्यादी असावेत. या दिशेने मुख्य दार असणे खूप चांगले आहे.
उत्तर-पश्चिम दिशा
त्याला वायव्य दिशा असेही म्हणतात. तुमचे शयनकक्ष, गॅरेज, गोठ्याची जागा या दिशेला असावी.
दक्षिण-पूर्व दिशा
याला घराचा आग्नेय कोन म्हणतात. ही अग्नि तत्त्वाची दिशा आहे. या दिशेला गॅस, बॉयलर, ट्रान्सफॉर्मर इत्यादी असावेत.
मेष राशीत चंद्राच्या प्रवेशाने तयार झाला चतुर्ग्रही योग, या राशींचे उजळणार भाग्य
या दिशेला नैऋत्य दिशाही म्हणतात. या दिशेला खिडक्या, दरवाजे अजिबात उघडू नयेत. घराच्या प्रमुखाची खोली येथे बनवता येते. या दिशेने तुम्ही कॅश काउंटर, मशीन इत्यादी ठेवू शकता.
घराचे अंगण
घरामध्ये अंगण नसेल तर घर अपूर्ण राहते. घर लहान असले तरी समोर आणि मागे अंगण असावे. तुळस, डाळिंब, जांभूळ, कडू कडुलिंब, आवळा या वनस्पतींसह अंगणात सकारात्मक ऊर्जा देणारी फुलांची रोपे लावावीत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion