मराठी बातम्या /बातम्या /religion /

काम होणार! हे प्राणी-पक्षी सकाळ सकाळी दिसले तर शुभ संकेत मानावे

काम होणार! हे प्राणी-पक्षी सकाळ सकाळी दिसले तर शुभ संकेत मानावे

शुभ संकेत देणारे प्राणी-पक्षी (प्रतिकात्मक फोटो)

शुभ संकेत देणारे प्राणी-पक्षी (प्रतिकात्मक फोटो)

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस बघावे लागतात. चांगले दिवस हसत-खेळत निघून जातात, पण जेव्हा संकटे येतात तेव्हा माणसाला एका वेळी एक दिवस घालवणे अवघड होऊन बसते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 22 नोव्हेंबर : असे म्हणतात की काळापेक्षा काहीही बलवान नाही. वेळ नेहमी कोणासाठी सारखी नसते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस बघावे लागतात. चांगले दिवस हसत-खेळत निघून जातात, पण जेव्हा संकटे येतात तेव्हा माणसाला एका वेळी एक दिवस घालवणे अवघड होऊन बसते. आपल्या जीवनात सदैव सुख-समृद्धी राहावी, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण, असं कधीच होत नाहीत प्रत्येकाला काही अडी-अडचणी येतात. पण या वाईट दिवसातच अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत असतात. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

1. चिमणी दिसणं हे नशिब पालटण्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे जेव्हा हा पक्षी तुमच्या अंगणात येऊ लागतो आणि त्याचा किलबिलाट सकाळी लवकर ऐकू येतो तेव्हा समजून घ्या की तुमचा येणारा काळ चांगला जाणार आहे. तुमच्या घरी एखादी चिमणी आली तर तिला धान्य नक्कीच टाका.

2. हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तुमच्या घरासमोर कुठेही अचानक गाय थांबली तर समजा तुमचा चांगला काळ येणार आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार घरात चपाती-भाकरी बनवताना पहिला भाग गायीसाठी काढला जातो. हा भाग गायीला खायला द्यायला विसरू नका.

3. सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल आणि वाटेत एखादा व्यक्ती पाण्याने भरलेले भांडे घेऊन जाताना दिसला तर ते तुमचे भविष्य चांगले होणार असल्याचे लक्षण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे समृद्धीचे लक्षण आहे.

4. सकाळी उठल्याबरोबर सहज पूजेचा नारळ दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की लवकरच तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion