मराठी बातम्या /बातम्या /religion /

Astro Tips: नशीब कधीही दगा नाही देणार, हे 5 ज्योतिषीय उपाय नियमित करून बघा

Astro Tips: नशीब कधीही दगा नाही देणार, हे 5 ज्योतिषीय उपाय नियमित करून बघा

कठोर परिश्रम करूनही अनेकांना त्याचे सकारात्मक परिणाम मिळत नाहीत आणि सतत समस्या येतात. या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि नशीब चमकण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 16 ऑगस्ट : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, अशी इच्छा असते. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला सुखी ठेवण्याचा ती व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न करते. परंतु कठोर परिश्रम करूनही अनेकांना त्याचे सकारात्मक परिणाम मिळत नाहीत आणि सतत समस्या येतात. या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया नशीब बदलणारे (Astrology Tips) विशेष 5 उपाय. 1. जेवताना दिशा लक्षात ठेवा - ज्योतिष शास्त्रानुसार जेवताना आपले तोंड पूर्वेकडे असावे. पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने जीवन आनंदी होते. शूज आणि चप्पल घालून कधीही जेवू नये. याशिवाय ज्यांच्यामुळे आपल्या खाण्यासाठी अन्न मिळत आहे, त्यांचे आभार मानायला विसरू नका. 2.घरात गंगाजल शिंपडावे - ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपर्‍यात नियमितपणे गंगाजल शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा संपते. याशिवाय घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. 3.सकाळ संध्याकाळ देव्हाऱ्यात दिवा लावावा - ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये देव्हाऱ्यात नियमितपणे पूजा करून दिवा लावावा. तसेच रविवारी उंबराच्या झाडाची मुळं आणून त्याची विधिवत पूजा करून तिजोरीत किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. 4. वाहत्या पाण्यात वाळलेली फुले सोडा - ज्योतिष शास्त्रानुसार देव्हाऱ्यात देवाला अर्पण केलेली फुले सुकवल्यानंतर आदरपूर्वक वाहत्य पाण्यात विसर्जित करावीत. घराच्या आजूबाजूला पाणी असणारी जागा नसेल तर एखाद्या ठिकाणी खड्डा खणून तिथेही गाडू शकता. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा 5. सकाळची स्वच्छता - धार्मिक मान्यतांनुसार, सकाळी उठून ब्रश करणे किंवा शरीराची इतर स्वच्छता आवश्यक आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करावे. आंघोळ न करता धार्मिक ग्रंथ आणि मूर्तीला हात लावणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील समृद्धी कमी होऊ लागते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या