मराठी बातम्या /बातम्या /religion /

Chaturmas 2022 : येणाऱ्या चार महिन्यांमध्ये 'या' पाच राशींवर असणार भगवान विष्णूंची विशेष कृपा, मिळणार आर्थिक लाभ आणि बरंच काही...

Chaturmas 2022 : येणाऱ्या चार महिन्यांमध्ये 'या' पाच राशींवर असणार भगवान विष्णूंची विशेष कृपा, मिळणार आर्थिक लाभ आणि बरंच काही...

हिंदू धर्मात तिथी, सणवार आणि काही महिन्यांना विशेष महत्त्व आहे. देवशयनी अर्थात आषाढी एकादशीपासून (10 जुलै 2022) चातुर्मास (Chaturmas) सुरू झालाय.

हिंदू धर्मात तिथी, सणवार आणि काही महिन्यांना विशेष महत्त्व आहे. देवशयनी अर्थात आषाढी एकादशीपासून (10 जुलै 2022) चातुर्मास (Chaturmas) सुरू झालाय.

हिंदू धर्मात तिथी, सणवार आणि काही महिन्यांना विशेष महत्त्व आहे. देवशयनी अर्थात आषाढी एकादशीपासून (10 जुलै 2022) चातुर्मास (Chaturmas) सुरू झालाय.

हिंदू धर्मात तिथी, सणवार आणि काही महिन्यांना विशेष महत्त्व आहे. देवशयनी अर्थात आषाढी एकादशीपासून (10 जुलै 2022) चातुर्मास (Chaturmas) सुरू झालाय. 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत चातुर्मास चालणार आहे. चातुर्मास हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. या कालावधीत शुभ कार्यं होत नसली तरी व्रतवैकल्यं, पूजाविधी आदी धार्मिक कार्यांसाठी हा काळ उत्तम असतो. ज्योतिषशास्त्राच्या (Jyotish shastra) दृष्टीनेदेखील चातुर्मास महत्त्वाचा समजला जातो. यंदाचा चातुर्मास मेष, वृषभ, मिथुन, कर्क आणि वृश्चिक या राशींसाठी (Zodiac Signs) शुभ फलदायी ठरेल, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. 'एनडीटीव्ही इंडिया'ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

चातुर्मासाला प्रारंभ होताच भगवान विष्णू (Lord Vishnu) योगनिद्रेत जातात. त्यामुळे या चार महिन्यांत सृष्टीचं पालनपोषण भगवान शंकराच्या (Lord Shiva) हाती असतं. या कालावधीत विवाह, गृहप्रवेशासारखी शुभकार्यं वर्ज्य समजली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाचा चातुर्मास बारापैकी पाच राशींसाठी विशेष शुभदायी ठरणार आहे. या राशींवर भगवान विष्णूची कृपादृष्टी राहील. या राशीच्या जातकांना धनलाभ, नोकरीच्या संधी मिळतील, असं अभ्यासकांचं मत आहे.

मेष (Aries) : ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या व्यक्तींसाठी आगामी चार महिने शुभ फलदायी ठरणार आहेत. चातुर्मासादरम्यान या राशीवर भगवान विष्णूची विशेष कृपा राहील. या राशीच्या व्यक्तींना कामांमध्ये यश मिळेल. त्यांची आर्थिक प्रगती होईल. नशिबाची साथ मिळेल. नव्या नोकरीचा शोध आवर्जून घ्या. त्यात यश मिळेल.

वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चातुर्मास लाभदायी ठरेल. करिअर आणि रोजगारात यश मिळेल. व्यापारात नफा होईल. परिश्रमातून व्यवसायाचा विस्तार साध्य होईल. चातुर्मासात विष्णुसहस्रनामाचे पाठ करणं शुभफलदायी ठरेल.

आला श्रावण आला! तुमचा महिन्याचा पहिलाच दिवस कसा जाणार पाहा राशिभविष्य

 मिथुन (Gemini) : आगामी चार महिने मिथुन राशीला शुभ ठरतील. भगवान विष्णूची विशेष कृपा राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. व्यापाराशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. खासगी व्यवसायात आर्थिक फायदा होईल. चातुर्मासादरम्यान गायीला चपाती खाऊ घालणं शुभफलदायी ठरेल.

कर्क (Cancer) : देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चार महिन्यांचा कालावधी कर्क राशीच्या व्यक्तींना शुभफलदायी ठरेल. भगवान विष्णूची कृपा राहील. चातुर्मासादरम्यान व्यापारात फायदा होण्याची शक्यता आहे. या कालावधीत गायीला चपाती, गूळ आणि हरभरा डाळ खाऊ घातल्यास लाभ होईल.

वृश्चिक (Scorpio) : ज्योतिषशास्त्रानुसार, चातुर्मासात भगवान विष्णूची वृश्चिक राशीवर विशेष कृपा राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. या कालावधीत भगवान विष्णूची कृपा प्राप्त होण्याचे योग आहेत.

First published: