मुंबई, 21 फेब्रुवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (21 फेब्रुवारी 2022) राशिभविष्य.
मेष (Aries): ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांशी असलेल्या संवादात सुधारणा होईल. आज तुम्हाला धनलाभ होईल. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल.
उपाय: गणपतीची पूजा करा.
वृषभ (Taurus): ऑफिसमध्ये तुम्ही विनाकारण चिंता कराल. एकाच वेळी दोन प्रोजेक्ट्सवर काम करू नका. सहजपणे बदल स्वीकारा. गरजांवर नियंत्रण ठेवा अन्यथा खर्च जास्त होईल.
उपाय: हनुमान मंदिरात बजरंग बाण म्हणा.
Somvati Amavasya 2023 : आज सोमवती अमावस्या, चुकूनही करू नका ही कामे
मिथुन (Gemini): व्यवसायामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील कोणतंही काम सूडाच्या भावनेनं करू नका. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
उपाय: सूर्याची पूजा करा.
कर्क (Cancer): दीर्घकाळ रखडलेल्या प्रोजेक्ट्समुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. भावनेच्या आहारी जाऊन कोणालाच वचन देऊ नका नाहीतर भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो.
उपाय: गणपतीला कुंकू वाहा.
सिंह (Leo): जर तुम्हाला आर्थिक त्रास टाळायचा असेल तर एकमेकांशी कोणताही व्यवहार करू नका. सततच्या त्रासामुळे तुमचं मनोबल खचेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारेल.
उपाय: गोशाळेला दान द्या.
कन्या (Virgo): बिझनेसमध्ये जबाबदारी वाढेल. नवीन लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची सखोल चौकशी करा. नाहीतर तुम्ही कायदेशीर वादात अडकू शकता. आज तुम्हाला गुंतवणुकीची संधी मिळेल पण, त्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
उपाय: बुध ग्रहाशी संबंधित वस्तूंचं दान करा.
योगिराज श्री शंकर महाराज : ``मै कैलास का रहनेवाला । मेरा नाम है शंकर"॥
तूळ (Libra): प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सतत वाढणाऱ्या गरजा तुम्हाला आर्थिक अडचणीत आणतील. तुम्हाला कर्जही घ्यावं लागेल.
उपाय: मुंग्यांना पीठ ठेवा.
वृश्चिक (Scorpio): प्रेमातील समस्या वाढू शकतात ज्यामुळे कार्यालयीन कामावरदेखील परिणाम होईल. दोन्ही बाबी वेगळ्या ठेवणं योग्य होईल. वेळेवर निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. नोकरीत नवीन संधी निर्माण होत आहे.
उपाय: प्राण्यांची सेवा करा.
धनू (Sagittarius): आज तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील. प्रियजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त पैसे खर्च होतील. व्यापाऱ्यांनी शहाणपणानं निर्णय घ्यावेत.
उपाय: सरस्वतीदेवीचा पूजा करा.
मकर (Capricorn): आज पैशाशी संबंधित समस्या राहतील. आर्थिक स्थितीबाबत मनात चिंता राहील. अनावश्यक खर्चासाठी कर्ज घ्यावं लागू शकतं. जमिनीत गुंतवणूक केल्यास फायदा होईल.
उपाय: शिवलिंगाला अभिषेक करा.
कुंभ (Aquarius): कार्यालयीन कामाची विनाकारण चिंता राहील. मनात अस्वस्थता राहील. कौटुंबिक जीवनातही उलथापालथ होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस निराशाजनक असेल.
उपाय: भैरव मंदिरात ध्वजदान करा.
मीन (Pisces): रखडलेल्या कामांची चिंता राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबच गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
उपाय: श्रीसूक्ताचं वाचन करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Rashichark