मराठी बातम्या /बातम्या /religion /Numerology : नंबर 3 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य

Numerology : नंबर 3 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य

नंबर 3 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नंबर 3 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नंबर 3 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 27 डिसेंबर: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 3 साठी कसं असेल, जाणून घ्या.

    #नंबर 3 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

    #नंबर 3 हा गुरूचं प्रतिनिधित्व करतो.

    #3 क्रमांकाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती सर्जनशील, ज्ञानी, मनमिळाऊ, बुद्धिमान आणि जीवनात आनंदी असतात. ते इतरांनादेखील आनंदी करतात. अशा व्यक्ती मनोरंजनाचा आनंद घेतात. येत्या वर्षात या व्यक्ती संगीत, नृत्य इत्यादी त्यांच्या सर्जनशील आवडींचा पाठपुरावा करून सोबतच करिअरमध्येही हवं ते साध्य करण्यात सक्षम असतील. गुरू हा ग्रह क्रमांक 3 चा स्वामी असल्यामुळे हे लोक अध्यात्मिक असतात. अशा व्यक्तींना त्यांच्या गुरू किंवा मार्गदर्शकामुळे खूप नाव आणि प्रसिद्धी मिळते.

    अशा व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या असतात. त्या सहज मित्र बनवतात आणि इतरांचं म्हणणं ऐकून घेण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असतं. या व्यक्ती इतरांना मदत करतात आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात सहाय्य करतात. पण, कधीकधी त्या आपल्या स्वतःच्याच काल्पनिक जगात अडकतात.

    आपल्या ध्येयापासून विचिलित होण्यास या व्यक्ती स्वत:च जबाबदार असतात. कालांतरानं याची त्यांना जाणीव होते आणि मग त्या जोरदार पुनरागमन करतात. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची आणि ती स्पष्ट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. या व्यक्ती खूपच आकर्षक असतात. त्यांची ओघवती भाषणशैली सहजपणे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून घेते.

    2023करिता #नंबर 3चं विश्लेषण

    #नंबर 3 - करिअर आणि पैशांच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज.

    3 क्रमांकासाठी 2023 हे खूप फायदेशीर ठरेल. विशेषत: जे विद्यार्थी आहेत आणि परदेशी ब्रँडसह व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हे वर्ष जास्त चांगलं असेल. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही अनेक नवीन कनेक्शन्स बनवू शकाल. जे तुमच्या करिअरमध्ये आणि एकूण प्रगतीमध्ये मदत करतील. दिग्गज मार्केटिंग कंपन्यांशी असलेले संबंध जास्त नफा मिळवून देतील. व्यवसायात प्रोप्रायटर असाल तर नशीब चांगली साथ देईल, भागादीरीतील फर्मनाही नव्या संधी मिळतील.

    बिझनेस ट्रॅन्झॅक्शन्स करताना इतरांना प्रवेश देऊ नका. या वर्षी पैशांमध्ये होणारी वाढ तुम्हाला उज्ज्वल भविष्याची हमी देण्यास मदत करेल. तुमच्या योजनेनुसार पैशांची शिल्लक वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत, 2023 हे वर्ष पैसे जमा करण्याचं आणि नोकरीच्या प्रमोशनसाठी अर्ज करण्यासाठी अनुकूल आहे.

    #नंबर 3 - प्रेम, कुटुंब आणि लग्नाच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज.

    2023 या वर्षात 3 जन्मांक असलेल्या व्यक्ती कौटुंबिक जीवनात असंतुलन अनुभवतील. आपण विवाहित जोडपं असाल किंवा रिलेशनशीपमध्ये असाल तर एकमेकांना स्पेस देणं हा सर्वांत गरजेचा निकष असेल. म्हणून एकमेकांच्या सीमांचा आदर करा आणि आनंदानं जगा. प्रेमात असलेल्या व्यक्तींना वाद-विवादांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. कदाचित यामुळे ब्रेकअपही होऊ शकतात म्हणून सावधगिरीने बोला. विवाहित जोडप्यांनी भूतकाळाबाबत चर्चा करण्यापेक्षा आणि तक्रारी करण्यापेक्षा भविष्याचं नियोजन करण्यासाठी अधिक वेळ द्यावा.

    गैरसमज टाळले पाहिजेत. पार्टनर्सनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आदर केला पाहिजे. प्रेम ही शुद्ध भावना आहे. जर तुम्ही कठीण परिस्थितीतून जात असाल तर एकमेकांना आधार द्या.

    2023 या वर्षात तुम्हाला विश्वास आणि विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतील. काळ बदलत राहतो. त्यामुळे एकदा तुम्ही ही परीक्षा यशस्वीरीत्या पास केली की, तुमचे जोडीदारासोबतचे नातेसंबंध आणि बंध अधिक दृढ होतील. 2023 मध्ये तुमच्या नात्यात काही अडचणी असतील तर त्या 2023 नंतरच्या वर्षात सुरळीत होतील.

    #नंबर 3 - 2023 या वर्षासाठी उपाय :

    1) करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी सकाळी तुळशीचं पानं खाऊन दिवसाची सुरुवात करा.

    2) नशीबाला उभारी मिळण्यासाठी पिवळे तांदूळ नेहमी सोबत असलेल्या पिशवीत ठेवा.

    शुभ रंग: पिवळा आणि व्हायलेट

    शुभ अंक: 1 आणि 3

    शुभ दिशा: ईशान्य आणि पूर्व

    शुभ दिवस: गुरुवार

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion