मराठी बातम्या /बातम्या /religion /मिथुन राशीसाठी कसं असेल 2023 हे वर्ष? जाणून घ्या भविष्य...

मिथुन राशीसाठी कसं असेल 2023 हे वर्ष? जाणून घ्या भविष्य...

करिअर : योग्य रूटीन तुम्हाला तुमच्या नव्या कामाशी जुळवून घ्यायला मदत करील.

करिअर : योग्य रूटीन तुम्हाला तुमच्या नव्या कामाशी जुळवून घ्यायला मदत करील.

करिअर : योग्य रूटीन तुम्हाला तुमच्या नव्या कामाशी जुळवून घ्यायला मदत करील.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई,30 डिसेंबर: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून मिथुन राशीचं 2023 या वर्षासाठीचं महिनानिहाय भविष्य सांगितलं आहे.

    मिथुन (Gemini) (मे 21 ते जून 21)

    जानेवारी :

    सर्वसाधारण : तुमच्या मार्गात लक्ष विचलित करण्यासारख्या अनेक गोष्टी सध्या येत असल्या, तरीही दिलेल्या कामावरच लक्ष केंद्रित ठेवल्यामुळे तुम्हाला कदाचित अपेक्षित परिणाम मिळू शकतील. शेजारी आलेल्या नव्या व्यक्ती तुमच्याबद्दल कदाचित असं काही मत बनवतील, ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकेल. एखादी छोटी ट्रिप दिलासादायक ठरू शकेल.

    रिलेशनशिप : तुमच्या सर्वांत जुन्या रिलेशनशिपमध्ये काही नवी आव्हानं येऊ शकतात. तुम्हाला त्यांच्यापासून अंतर पडल्यासारखंही वाटू शकेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करणं हाच एक उपाय असू शकतो.

    करिअर : जवळच्या फॅमिली फ्रेंडकडून नव्या नोकरीसाठी काही सजेशन येऊ शकेल. तुम्ही आधीच इंटरव्ह्यू दिला असेल, तर निवड होण्याची संधी दिसते. प्रवेश परीक्षेला बसण्याच्या विचारात असलात, तर काही सरप्राइजेस मिळू शकतील.

    लकी रंग : Fuchsia

    फेब्रुवारी :

    सर्वसाधारण : प्रगत अभ्यासासाठीचं नियोजन करताना तुम्हाला कदाचित सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. प्रगतीसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. एखादी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. घरापासून दूर राहत असलात, तर होम सिक वाटू शकेल; मात्र ते तात्पुरतं असेल. व्यायामाचं चांगलं रूटीन बसवणं आता शक्य होऊ शकेल. आई-वडिलांच्या प्रकृतीच्या कारणामुळे तुम्हाला त्रास होऊ शकेल आणि तुम्ही शीघ्रकोपी होऊ शकाल.

    रिलेशनशिप : काही वेळा तुम्हाला अडकल्यासारखं वाटेल. एकसुरीपणा येणं हेदेखील एक कारण असू शकेल. दुसऱ्या बाजूने संवादाचा अभाव हेही एक कारण असू शकेल.

    करिअर : योग्य रूटीन तुम्हाला तुमच्या नव्या कामाशी जुळवून घ्यायला मदत करील. टीममधल्या वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला तुमच्यापेक्षा प्राधान्यक्रम दिला जाऊ शकतो. टिकून राहण्यासाठी तुम्हाला तुमची सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी बदलावी लागू शकेल.

    लकी रंग : Tan

    'अपना टाइम' आलाच! घड्याळात अनेकदा 11:11 वाजलेले दिसतात का? नशीब बदलण्याची हीच ती वेळ

    मार्च :

    सर्वसाधारण : तुम्ही जी झेप घेण्याचं नियोजन करत आहात, ती घेण्यासाठी आता चांगला काळ असू शकेल. पार्टनरशिपमुळे तुमच्या चिंता मोठ्या पातळीवर कमी होऊ शकतील. त्यामुळे कष्टांच्या काळात कुशनप्रमाणे उपयोग होऊ शकेल. लग्नाचं औपचारिकरीत्या आलेलं स्थळ योग्य ठरेल. तुमच्या मनात स्पष्टता येईल. अचानक एखादा प्लॅन किंवा मित्रांशी झालेला कॉल दिलासादायक ठरेल.

    रिलेशनशिप : उत्साह खूपच लवकर व्यक्त केला जाईल. रिलेशनशिप बहरण्यासाठी संयम ही महत्त्वाची बाब ठरेल. नव्याने प्रेमात पडला असलात, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचे कुटुंबीय, तसंच पार्श्वभूमीबद्दल माहिती काढणं गरजेचं आहे.

    करिअर : बिझनेस आयडियाजमधून चांगले प्राथमिक परिणाम साध्य होऊ शकतील. दीर्घकालीन कामाचं नियोजन करायचं असेल, तर टायअप किंवा कोलॅबोरेशन ही महत्त्वाची बाब आहे. नव्या कल्पनेसाठी नवी स्पेस तयार करा. त्यामुळे कामासाठी नवी ऊर्जा मिळेल.

    लकी रंग : Magenta

    एप्रिल :

    सर्वसाधारण : तुम्ही कायदेशीर केसमध्ये अडकलेले असलात, तर तुमचे पुरावे सुरक्षित असल्याची खात्री करा. एखादी जवळची व्यक्ती तुमच्याबद्दलची गुप्त माहिती बाहेर पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. घरगुती आयुष्याकडे काही काळ दुर्लक्ष केलं जाईल. स्वतःसाठी काही वेळ काढणं तुम्हाला पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरेल.

    रिलेशनशिप : भूतकाळात तुम्ही तुमच्या रिलेशनशिपसाठी उचललेली छोटी पावलं ताणाच्या काळात अत्यंत महत्त्वाची, बचाव करणारी ठरतील. तुमच्या समस्यांबद्दल एखाद्या जवळच्या मित्राकडून उत्कृष्ट सल्ला मिळू शकेल. पूर्वीपासून तुम्ही ज्या व्यक्तीच्या संपर्कात होतात, तिची आठवण येऊ शकेल, तिला मिस कराल.

    करिअर : काम होण्यासारखं आहे; मात्र दमवणारं आहे. अनेक डेडलाइन्स पाळण्यासाठी काम केल्यामुळे तुम्ही दमाल. एखाद्या छोट्या प्रवासाच्या प्लॅनमुळे तुमचं रूटीन बिघडेल.

    लकी रंग : Mauve

    मे :

    सर्वसाधारण : लवकर किंवा उशिरा, तुम्ही हे कबूल कराल, की निवड घाईगडबडीत करायची नसते. तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास होताच; पण आता इतरांनाही त्याबद्दल खात्री वाटत असल्याचं तुम्हाला जाणवेल. आतल्या आवाजामुळे तुम्ही अनेकदा विचलित व्हाल; मात्र त्याकडे जास्त लक्ष न देण्याचं धोरण अवलंबा. सध्याचा काळ स्वच्छ आणि गुंतागुंतीच्या नसलेल्या समोरच्या रस्त्यावर चालण्याचा आहे.

    रिलेशनशिप : तुमच्या जोडीदाराकडून सपोर्ट मिळण्याची पुन्हा एकदा खात्री होईल. तुम्ही बऱ्याच काळापासून कोणाला डेट करत असलात, तर आता काही गोष्टी व्यक्त करण्याची गरज आहे. अचानक स्वतःला व्यक्त करताना स्वतःच्या शब्दांवर लक्ष ठेवा.

    करिअर : कामाच्या ठिकाणी थोडी अस्वस्थता असल्याचा काळ येण्याचे संकेत आहेत. एखादी अतिरिक्त जबाबदारी आली, तर ती नाकारू किंवा टाळू नका. महत्त्वाच्या अनाउन्समेंटमध्ये उशीर होऊ शकेल.

    लकी रंग : Lilac

    जून :

    सर्वसाधारण : तुमच्या कौशल्याचा आता वापर केलाच पाहिजे, वेळकाढूपणा खूप झाला. संथ रूटीन काही आठवड्यांत अत्यंत दमवणाऱ्या रूटीनमध्ये रूपांतरित होईल. तुमच्या आवडीच्या संधीसाठी तुम्ही शोध घेत आहात. एखादी जवळची व्यक्ती ते पाहत आहे. त्यांच्याकडून तुम्हाला आता काही तरी समजेल. व्यक्तिमत्त्वाचा एखादा किरकोळ बदल संभवतो. तो चांगल्यासाठी असेल आणि खासकरून स्वयंजागरूकतेतून झालेला असेल.

    रिलेशनशिप : हा महिना संयमाचा आहे. या महिन्याच्या अखेरीला त्याची फळं मिळण्याची शक्यता आहे. एखादा दीर्घ काळ प्रलंबित असलेला निर्णय कदाचित तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकेल. तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात आलेलं कोणी तरी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकेल.

    करिअर : कामाच्या ताणात अचानक खूप वाढ झाल्यामुळे अन्य बाबी बाजूला ठेवल्या जातील. प्रोफेशनल डिग्रीज घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बिझी सीझन असेल. अनपेक्षितपणे आलेल्या इंटरव्ह्यू कॉलमुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

    लकी रंग : Lemon

    जुलै :

    सर्वसाधारण : भूतकाळातल्या काही तीव्र आठवणी तुमचा नवा दृष्टिकोन ठरवतील. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत तुम्ही दक्ष राहाल. तातडीच्या महत्त्वाच्या काही बाबींमध्ये तुम्हाला स्पष्टता येत नसेल, तर त्यासाठी मदत घ्यावी. रोड ट्रिपला जायटं असेल, तर तिचं प्लॅनिंग करावं.

    रिलेशनशिप : तुम्ही स्वतःवर खूपच टीका करत असल्याचं लक्षात येईल. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधून तुम्ही बाहेर पडल्यासारखं तुम्हाला वाटेल. नव्याने कोणाच्या प्रेमात पडला असलात, तर तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल.

    करिअर : . थोड्या चांगल्या आर्थिक प्रगतीमुळे तुमची गाडी पुन्हा रुळावर येईल. तुमच्या प्रोफेशनल फ्युचरसाठी तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला घ्यावासा वाटेल. कॉलेजमध्ये असलात, तर कोणाच्या प्रभावाखाली येऊन काही करण्यापेक्षा तुम्हाला योग्य वाटेल, ते करा.

    लकी रंग : Crimson

    ऑगस्ट :

    सर्वसाधारण : इतरांवर दबाव आणण्याचे तुमचे डावपेच काही जणांवर उपयोगी ठरतील, सर्वांवर नाही. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या काही व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकाल. तुमचा हेतू स्वच्छ असला, तरी संवादाच्या पद्धतीत बदल गरजेचा आहे. अधिकारपदावर असलात, तर तसा प्रभाव पाडणं सुरू ठेवाल.

    रिलेशनशिप : तुमची रिलेशनशिप ज्या प्रकारची आहे, त्यावरून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तींना प्रेरणा द्याल. मनातल्या एखाद्या विशिष्ट शंकेबद्दलचं सकारात्मक चिन्ह तुम्हाला पुन्हा खात्री पटवून देऊ शकेल. शांततेसाठी तुम्हाला हव्या असलेल्या ट्रिपकरिता तुमची ऊर्जा राखून ठेवा.

    करिअर : गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत असलेल्या बिझनेसमध्ये सुधारणा होताना दिसेल. कम्प्युटर हार्डवेअरशी निगडित व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. दर वर्षी सातत्याने होत असलेली तुमची प्रगती भविष्याबाबत तशी खात्री देऊ शकेल असं नाही.

    लकी रंग : Plum

    सप्टेंबर :

    सर्वसाधारण : नव्या संधी गोंधळात टाकू शकतील. त्या धोक्याच्या असू शकतील. तुमच्या क्षेत्रातली एखादी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला भेटू शकेल. त्या व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल. परिस्थितीचा तातडीने ताबा घेतला नाहीत, तर वाद होण्याची शक्यता आहे. एखादा नवा छंद तुम्हाला पुन्हा आकर्षून घेईल. तुम्हाला शांत राखण्यास मदत करील.

    रिलेशनशिप : रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असलात, तर त्यात काही क्वालिटी टाइम गुंतवण्याची गरज भासेल. तुमच्या पार्टनरने काही गृहीतकं धरली आहेत. त्यांचं निराकरण केलं पाहिजे. काही काळ बाहेर पडणं उपयोगी ठरेल.

    करिअर : बिझनेसमध्ये असलात, तर लवकरच तुम्हाला कामासाठी नवी जागा मिळेल. तुम्ही करिअरची सुरुवात करण्याची वाट पाहत असलात, तर नवा चॅप्टर सुरू होऊ शकेल. एखाद्या चांगल्या शिफारशीमुळे या प्रक्रियेला चालना मिळू शकेल.

    लकी रंग : Steel Grey

    ऑक्टोबर :

    सर्वसाधारण : तुम्ही नव्या कल्पना आणण्याचा विचार करत असलात किंवा प्रगती करण्याची संधी शोधत असलात, तर खऱ्या प्रयत्नांची गरज आहे. आगामी दिवसांत तुम्हाला काम अधिक प्रभावी पद्धतीने पूर्ण करण्याचे पर्याय समोर येऊ शकतात. तुम्हाला अधिक कॉन्फिडंट आणि मैत्रिपूर्ण वाटू शकेल. गेल्या काही काळपासून होणारा त्रास आता जाणवणार नाही. तुमचा जोडीदार असं एखादं सजेशन सांगेल, की त्याचा विचार करण्यासारखा असेल.

    रिलेशनशिप : हार्टब्रेकमधून सावरण्याचा प्रयत्न करत असलात, तर काहीसा दिलासा मिळू शकेल. एखादी नव्या व्यक्ती तुमच्या मार्गात येऊ शकेल. तुम्हाला अगदी जवळच्या वाटणाऱ्या व्यक्तीच्या मनात तशाच भावना नसतील आणि तुम्हाला ते समजेल.

    करिअर : शिस्तीचा अभाव असू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या उत्पादकतेशीही तडजोड झालेली असेल. कामाच्या ठिकाणी लवकरच तुम्हाला नवी तंत्रं मिळतील. त्यामुळे तुम्हाला अधिक वेगाने पुढची प्रगती करता येईल.

    लकी रंग : Azure

    नोव्हेंबर :

    सर्वसाधारण : 'आता पुरे झालं' अशा विचाराप्रत तुम्ही येण्याच्या बेतात आहात. अनेकदा हावभाव भावनांपेक्षा खूप जास्त असतील; मात्र तुमच्या मनात काय आहे, हे अन्य व्यक्तीला समजणं महत्त्वाचं आहे. जुन्या भीतीला आता लवकरच बाहेरचा रस्ता मिळेल. परदेशातले काही पाहुणे लवकरच तुमच्या भेटीला येतील.

    रिलेशनशिप : रिलेशनशिप्समधून आता स्थिरतेचं वचन मिळेल. त्यामुळे तुम्हाला त्यात गुंतवणूक करावीशी वाटेल. बऱ्याच अस्वस्थतेनंतर या महिन्यात सुटकेचा निःश्वास टाकाल. स्वतःच्या खऱ्या भावना व्यक्त करताना काही वेळा तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल.

    करिअर : नव्या नोकरीच्या शोधात असलात, तर जुन्या संधी नव्याने दिसायला सुरुवात होऊ शकेल. काळजीपूर्वक निवड करण्याची गरज आहे. संधीच्या अनुषंगाने पूर्वीचा बॉस तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे.

    लकी रंग : Rose

    डिसेंबर :

    सर्वसाधारण : ऊर्जा आता जागेवर आहे असं वाटेल. आता तुम्हाला जे काही पूर्ण करावंसं वाटत आहे, ते तुमच्या कृतीला जोड देणारंही असावं लागेल. एखाद्या लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला नवे मार्ग शोधावे लागतील. नवी कौशल्यं शिकण्याची खरी इच्छा सुरू होऊ शकेल. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल केल्यास त्यातून काही बिझनेस आयडिया तयार होऊ शकतात.

    रिलेशनशिप : प्राथमिक पातळीवर विचार करायचा झाल्यास, तुमच्या मनात पार्टनरबद्दल अद्याप काही नाराजी आहे. शक्य तितक्या लवकर तुम्ही ती काढून टाकली पाहिजे. गैरसमज होण्याचीही शक्यता आहे.

    करिअर : लीगल प्रोफेशनमध्ये असलेल्या व्यक्तींनी काळजीपूर्वक संवाद साधला पाहिजे, जेणेकरून गैरसमज टळतील. तुम्हाला मानसिक स्पष्टताही मोठ्या प्रमाणावर मिळेल. पूर्वी घेतलेले काही निर्णय वारंवार मनात येऊन त्रासदायक ठरतील.

    लकी रंग : Bronze

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion