मुंबई, 19 मार्च : आज 19 मार्चपासून या महिन्याचा नवा आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा 19 मार्च ते 25 मार्च असा असेल. आज रवि प्रदोष व्रत असून फाल्गुन महिन्यातील हे प्रदोष व्रत आहे. या आठवड्यात मासिक शिवरात्री, अमावस्या, चैत्र नवरात्री, घटस्थापना, हिंदू नववर्षाची सुरुवात, गुढी पाडवा, विनायक चतुर्थी असे धार्मिक सण येत आहेत. या सप्ताहात नवरात्रीपासून सुरू होणाऱ्या 4 दिवसांचा समावेश आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून या आठवड्यातील सण-उपवास इत्यादींची अधिक माहिती जाणून घेऊया.
मार्च 2023 च्या चौथ्या आठवड्यातील उपवास-सण
19 मार्च, रविवार: रवि प्रदोष व्रत
प्रदोष व्रत : रवि प्रदोष व्रत पाळल्याने आणि शिव-शंकराची पूजा केल्यानं चागलं आरोग्य लाभतं, असं मानलं जातं. या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथाची पूजा केली जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला पाळले जाते.
20 मार्च, सोमवार: मासिक शिवरात्री
मासिक शिवरात्री : फाल्गुन मासिक शिवरात्री सोमवारी आहे. सोमवार हा शिवपूजनाचा दिवस आहे. अशा स्थितीत सोमवारी शिवरात्री असणे अत्यंत फलदायी मानले जाते. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीचे व्रत केले जाते. या दिवशी निशिता मुहूर्तावर शिवाची पूजा केली जाते.
21 मार्च, मंगळवार: अमावस्या
भूतडी अमावस्या : भूतडी किंवा भौमवती अमावस्या ही फाल्गुन कृष्ण पक्षातील अमावास्येला असते. या दिवशी नदीमध्ये स्नान- दान केल्यानं पुण्य मिळतं. या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंडदान इत्यादी केले जातात. कालसर्प दोष दूर करण्याचे उपायही अमावस्येला केले जातात.
22 मार्च, बुधवार: हिंदू नववर्ष विक्रम संवत 2080 सुरू होते, चैत्र नवरात्रीची सुरुवात होते, घटस्थापना, देवी शैलपुत्रीची पूजा, गुढी पाडवा आहे. हिंदू नववर्ष विक्रम संवत 2080: हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. याला गुढी पाडवा असेही म्हणतात. या वर्षी हिंदू नववर्ष विक्रम संवत 2080 22 मार्चपासून सुरू होत आहे.
चैत्र नवरात्री 2023: चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीपासून होते. या दिवशी सर्वप्रथम कलशाची स्थापना (घटस्थापना) केली जाते, त्यानंतर देवी दुर्गेच्या पहिल्या अवताराची म्हणजे देवी शैलपुत्री म्हणून पूजा केली जाते. यंदा चैत्र नवरात्र पूर्ण 9 दिवसांची आहे.
रमजान 2023: यावर्षी चैत्र नवरात्रीसोबतच रमजानचा पवित्र महिना 22 मार्चपासून सुरू होत आहे. रमजानमध्ये उपवास ठेवला जातो आणि देवाची पूजा केली जाते. रमजानचा पहिला उपवास 23 मार्च रोजी ठेवला जाणार आहे.
23 मार्च, गुरुवार: देवी ब्रह्मचारिणीची उपासना
24 मार्च, शुक्रवार: देवी चंद्रघंटाची पूजा
25 मार्च, शनिवार: देवी कुष्मांडाची उपासना
चैत्र विनायक चतुर्थी 2023: चैत्रातील विनायक चतुर्थी 24 मार्च रोजी आहे. या दिवशी उपवास ठेवून गणेशाची पूजा करा. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस असून देवी कुष्मांडाची पूजा केली जाईल. विनायक चतुर्थीच्या वेळी चंद्रदर्शन निषिद्ध आहे.
हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Culture and tradition, Lifestyle, Religion