पुण्यात दारूच्या बाटलीने राष्ट्रीय स्केटिंग पटूची गळा चिरून हत्या

पुण्यात दारूच्या बाटलीने राष्ट्रीय स्केटिंग पटूची गळा चिरून हत्या

निलेश नाईक हा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी

  • Share this:

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड,4 डिसेंबर: राष्ट्रीय स्केटिंग पटूची दारूच्या बाटलीने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मांरुजीच्या मोकळ्या मैदानात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.निलेश नाईक असे मृत तरुणाचे नाव असून तो कोल्हापूरचा रहिवासी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंजवळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मांरुजी येथील मोकळ्या मैदानात निलेशची अज्ञात मारेकऱ्यांनी त्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. दारू पिताना झालेल्या वादातून ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. निलेश नाईक असे मृत तरूणाचे नाव असून बीयरची बाटली फोडून तिच्याने निलेशचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना समोर आली.

राष्ट्रीय स्केटिंग पटू होता निलेश..

निलेश नाईक हा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहे. मांरूजी येथील कोलते पाटील साइटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात निलेशचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. निलेश आणि त्याचे काही मित्र मैदानावर दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर एकाने निलेशच्या डोक्यात बीयरची बाटली फोडली. नंतर निलेशचा गळा चिरून मारेकरी फरार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी निलेशचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. फरार झालेल्या आरोपींचा पोलिश शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 01:15 PM IST

ताज्या बातम्या