पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं... असं व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं... असं व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन प्रेयसीला लॉजमध्ये नेऊन तिचा खून करुन फरार झालेल्या प्रियकराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

पुणे, 6 सप्टेंबर: दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन प्रेयसीला लॉजमध्ये नेऊन तिचा खून करुन फरार झालेल्या प्रियकराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. श्रीराम गिरी असे या तरुणाचे नाव आहे. 'आपले पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं असून मी या जगाचा निरोप घेतोय', असे व्हॉट्सअप स्टेटस श्रीराम गिरी याने आत्महत्या करण्यापूर्वी ठेवले होते. इंद्रायणी नदीत उडी घेऊन श्रीराम याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे.

काय आहे हे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम सुग्रीव गिरी असे आरोपीचे नाव होते मावळ तालुक्यातील वडगाव येथील निसर्गवारा लॉजवर दोघे रूम क्रमांक 303 मध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. काही कारणावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. श्रीराम गिरी यांने त्याच्याकडील ब्लेडने प्रेयसीचा हात, गळा आणि पोटावर सपासप वार केले. अतिरक्तस्त्रावामुळे मुलीचा रूममध्येच मृत्यू झाला. घटनेनंतर आपोरीने तिथून पोबारा केला आहे. आरोपी घाईघाईत लॉजमधून जात असताना लॉजच्या एका कर्मचाऱ्याने त्याला हटकले. परंतु प्रेयसी तयारी करुन खाली येत असल्याचे सांगून त्याने दुचाकीवरुन पळ काढला.

इंद्रायणीच्या काठावर सापडली आरोपीचा दुचाकी..

फरार आरोपी श्रीराम गिरी याच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके तयार करून त्याच्या शोधासाठी रवाना केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. रात्री उशिरा वडगाव मावळ पोलीस ठाण्यात या खुनासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान आरोपीची दुचाकी इंद्रायणी नदीकाठी सापडली आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता.

मुंबईच्या पावसात सलमान निघाला सायकलवर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2019 10:06 PM IST

ताज्या बातम्या