पुण्यात आणखी एक हत्या, भाजीवरून झालेल्या वादात मित्राला दगडाने ठेचलं

नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील सर्व्हे क्रमांक 8मध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये किरणची हत्या करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2019 03:13 PM IST

पुण्यात आणखी एक हत्या, भाजीवरून झालेल्या वादात मित्राला दगडाने ठेचलं

पुणे, 05 फेब्रुवारी : पुण्यात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो. कारण एकाच दिवसात पुण्यात गुन्हा घडल्याची ही तिसरी घटना आहे. किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेने मैत्रिसारख्या निर्मळ नात्याचा खून झाला असं म्हणायला हरकत नाही. किरण काटकर (वय 28 वर्ष) याची मंगळवारी (5 फेब्रुवारी) पहाटे डोक्यात दगड घालून हत्या केली. नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील सर्व्हे क्रमांक 8मध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये किरणची हत्या करण्यात आली.

सोमवारी रात्री किरण आणि त्याचा मित्र पप्पू पाटील हे दोघेही दारूच्या नशेत होते. यावेळेस दोघांमध्ये भाजी आणण्यावरून वाद झाला. या वादातून पहाटेच्या सुमारास आरोपीने किरणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले पण आरोपी फरार झाला. तर पोलिसांचं पथक आरोपीचा शोध घेत आहे. दरम्यान, किरणचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पण किरणला अशा पद्धतीने गमावल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर त्याच्या मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे.

Loading...

पिंपरीत रक्ताची सकाळ, सराईत गुन्हेगार सुनील आरडेची निर्घृण हत्या

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिचंवड म्हणजे गुन्ह्यांची नगरी झाली आहे. कारण सोमवारी रात्रीच्या सुमारास पिंपरी-दापोडीमध्ये अज्ञात टोळक्याकडून सराईत गुन्हेगार सुनील आरडेची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आजची सकाळ ही पिंपरीकरांसाठी धक्कादायक होती.

अज्ञात टोळक्यांनी सुनील आरडेची निर्घृण हत्या केली आहे. दगडाने ठेचून त्याला मारण्यात आलं आहे. या हल्ल्यामध्ये आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. अनिकते चांदणे असं जखमीचं नाव आहे. तो सुनीलचा साथीदार आहे.

पूर्ववैमनस्यातून प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार त्यांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहेत. तर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पिंपरीत होणाऱ्या अशा खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून सुनीलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस घटनास्थळी संशयास्पद वस्तूंचा तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहेत.


Special Report : ऑनलाईन बँकिंग करताना सावधान! या एका गोष्टीमुळे होईल मोठं नुकसान


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 03:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...