पुणे, 1 मार्च : स्वतःला ज्या गोष्टींची सतत गरज पडते त्यांचाच वेगळा विचार केला तर त्यातूनही बऱ्याचदा व्यवसाय उभा राहू शकतो. एका तरुणीनं हीच गोष्ट स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध केली आहे.
पुण्याच्या या तरुणीचं नाव आहे मेघा बाफना. मेघा मागच्या 15 वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात काम करते आहे. तिला कायमच सॅलड्स बनवणं, त्यात विविध प्रयोग करणं आवडायचं. 2017 मध्ये तिला वाटलं, की आपण मित्र-मैत्रिणींना आपली सॅलड्स खायला देतो. आता जगाला खायला घालू. (start up success story of Pune woman)
मेघानं लगेच चार ओळींची मस्त जाहिरात तयार केली. हे सगळं व्हॉट्सपवर आपल्या मित्रांच्या ग्रुप्समध्ये शेअर केलं. हळूहळू हे अनेकांपर्यंत पोचलं. (Megha Bafna Salad start up)
पहिल्या दिवशी मेघाला 5 पॅकेट्सची ऑर्डर मिळाली. तेव्हा तिला याचं पॅकेजिंग, डिलिव्हरी, क्वांटिटी यांची काही कल्पना नव्हती. मात्र आपल्या सॅलडची टेस्ट अनोखी आहे हे तिला नक्की माहीत होतं. ती सकाळी साडेचार वाजता उठायची. साडेसहापर्यंत प्राथमिक तयारी करायची. मग भाज्या आणायला बाजारात जायची. तोवर मसालाही थंड व्हायचा. साडेसात वाजता भाज्या साफ करणं, कापणं सुरू व्हायचं. साडेनऊपर्यंत पॅकिंग व्हायची. (Megha Bafna Salad business success story)
मेघानं सुरुवात पाच प्रकारच्या सॅलड्सनं केली. यात चणे, मिक्स कॉर्न, बीट, पास्ता सॅलड यांचा समावेश होता. घरी कामाला येणाऱ्या मदतनीस ताईंच्या मुलाला तिनं डिलिव्हरीच्या कामाला ठेवलं. मेघा अपॅकिंग करून बाहेर जायची. दहा वाजता डिलिव्हरी बॉय येऊन सगळं घेऊन जायचा. 2 तासात सगळ्यांना सलाड पोचवायचा. एक आठवडा 6 पॅकेट्स विकले गेले. मग अजून काही जणांना हे कळालं. त्याच्या पुढच्या आठवड्यात 25 पॅकेट्स गेले. (Megha Bafna Salad inspiring story)
तिसऱ्या आठवड्यात 50 गेले. पुढचे पाच महिने हीच संख्या कायम होती. मग मेघानं पुण्यातील एका महिलांच्या ग्रुपवर सॅलडचे फोटो आणि मेन्यू शेअर केला. तिथं तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक कंपनीज, घरं आणि शाळांतून कॉल्स आले. जवळपास 60 ते 70 नवे क्लायंट मिळाले. जवळपास 150 ग्राहक बनले.
हेही वाचा तरुणीच्या जिद्दीला सलाम; पाय गमावलेली सोनम ठरली सर्वोत्कृष्ट डान्सर
सुरुवातीला मेघा यांना क्वांटिटीचा कुठला अंदाज नव्हता. अनेकदा सॅलड कमी पडायचं, कधी जास्त बनायचं. मग मेघानं अजून नीट नियोजन केलं. हळूहळू तिला कल्पना आली. आधी ती पेपर कंटेनरमध्ये डिलिव्हरी द्यायची. त्यातून लिकेज व्हायचं. मग तिनं प्लास्टिक कंटेनर द्यायला सुरवात केली. आधी सॅलडच्या किमती 59 आणि 69 अशा होत्या. ना नफा ना तोटा अशी सुरवात मेघानं केली होती. दीड महिन्यानंतर तिला नफा होऊ लागला. दर महिन्याला 5 ते 7 हजार रुपये वाचू लागले. हळूहळू ग्राहक वाढले तसा नफाही वाढला.
हेही वाचा छोट्याशा मैत्रिणीचा बॉल मिळवण्यासाठी कुत्र्यानं केलं असं काही, नेटकरी झाले भावुक
लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मेघाकडे 200 ग्राहक झाले. महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये उरायचे. चार वर्षात तिनं यातून जवळपास 22 लाख रुपये कमावले. मेघा सांगते, 'या कामात माझे पती आणि सासूबाईंनी खूप सपोर्ट केला. नोकरी सांभाळून हे सगळं केलं. माझ्या रेसिपीज गूगलवारही सापडणार नाहीत. कारण त्या मी बनवलेल्या आहेत.' मेघानं लॉकडाऊनच्या आधी 10 डिलिव्हरी बॉईज आणि 9 महिलांना काम दिलं होतं. आता कोरोनाव्हायरसची साथ संपल्यावर तिचं काम अजून वेग घेईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.