• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • हातात कोयता घेऊन तरुणाची Whatsapp वर डॉनगिरी; पोलिसांनी केली उचलबांगडी

हातात कोयता घेऊन तरुणाची Whatsapp वर डॉनगिरी; पोलिसांनी केली उचलबांगडी

Crime news: हातात कोयता घेऊन (scythe in hand) काढलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटसला (Whatsapp status) ठेवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

 • Share this:
  चंदननगर, 28 जून: हातात कोयता घेऊन (scythe in hand) काढलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटसला (Whatsapp status) ठेवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. घातक शस्त्रांचं Whatsapp वर प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक (Young man arrest) केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक धारदार कोयता (Sharp scythe seized) देखील जप्त केला आहे. हातात कोयता ठेऊन Whatsapp वर डॉनगिरी करण्याऱ्या या तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. अनिकेत साठे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असून तो चंदननगर परिसरातील आंबेडकरनगर याठिकाणी राहतो. चंदननगर पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली असून त्याच्यावर सामाजिक शांतता भंग करणे, घातक शस्त्रांचं प्रदर्शन करणे, अशा अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाकडे आणखी काही हत्यारं आहेत का? किंवा त्याचा गुन्हेगारी क्षेत्राशी काही संबंध आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत. चंदननगर परिसरात राहणारा आरोपी अनिकेत साठे हातामध्ये कोयता घेऊन उभा असल्याचे फोटो Whatsapp वर स्टेटसला ठेवत असतो, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुरावे गोळा केल्यानंतर, पोलिसांनी चंदननगर येथील पाण्याच्या टाकीजवळून आरोपीची उचलबांगडी केली आहे. दरम्यान त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. हेही वाचा-कोयता घेऊन फेसबुकवर केली हवा; सोशल मीडिया डॉनला पोलिसांनी ढसाढसा रडवलं सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आपल्या पोलीस पथकाच्या मदतीनं सापळा रचून ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून धारदार कोयता देखील जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपी अनिकेत साठेला सध्या ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई केली जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: