Home /News /pune /

BREAKING: दिवसाढवळ्या 6 गोळ्या घालून तरुणाला पाडलं रक्ताच्या थारोळ्यात; पुण्यातील थरारक घटना

BREAKING: दिवसाढवळ्या 6 गोळ्या घालून तरुणाला पाडलं रक्ताच्या थारोळ्यात; पुण्यातील थरारक घटना

Murder in Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

    पुणे, 06 डिसेंबर: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या (Brutal murder by gun firing) करण्यात आली आहे. दुचाकीवरून अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी तरुणावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली असून पोलीस अधिकाऱ्यासह गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. समीर मनूर शेख (Samir shaikh murder) असं हत्या झालेल्य तरुणाचं नाव आहे. हा हल्ला सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. अचानक दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी बेसावध असलेल्या समीरवर बेछूट गोळीबार केला आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, समीर हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आहे. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हेही वाचा-मुंबई हादरली! फोन करून पत्नीला ऐकवला शेवटचा आवाज मग लेकीसोबत केलं राक्षसी कृत्य संबंधित हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेच्या तपासाला वेग दिला आहे. तसेच परिसराती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही हालचाली आढळतात का? याचा तपास देखील पोलिसांकडून केला जात आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. हेही वाचा-Mumbai: क्षणभराचा आनंद जीवावर बेतला;साडीचा झोका खेळणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हल्ला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहित वडेवाले जवळील चंद्रभागा वाईन्ससमोर हा प्रकार घडला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Pune

    पुढील बातम्या