मराठी बातम्या /बातम्या /पुणे /तू सीमेवर लढ, तुझ्या कुटुंबासाठी आम्ही लढतो; सैनिकाच्या पित्याला अनोळखी तरुणानं मिळवून दिला बेड

तू सीमेवर लढ, तुझ्या कुटुंबासाठी आम्ही लढतो; सैनिकाच्या पित्याला अनोळखी तरुणानं मिळवून दिला बेड

कोरोनाकाळात सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी घरात कोणीही कर्ता पुरुष नाहीये. त्यामुळे अनेक सैनिकी कुटुंबीयांची हेळसांड होतं आहे. अशात पुणे जिल्ह्यातील फलटणमध्ये मात्र काहीजणांनी मध्यरात्री सैनिकी पित्याला मदत मिळवून देऊन एक आदर्श घातला आहे.

पुढे वाचा ...

फलटण, 02 मे: सध्या देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग वेगाने पसरत आहे. अशात सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी घरात कोणीही कर्ता पुरुष नाहीये. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संकटकाळात अनेक सैनिकी कुटुंबीयांची हेळसांड होतं आहे. पण दुसरीकडे फलटणमध्ये मात्र काहीजणांनी सैनिकी पित्याला मदत करून एक आदर्श घालून दिला आहे. त्यांनी काल रात्री अचानक एका कोरोनाग्रस्त सैनिक पित्याची प्रकृती बिघडल्यांनतर मदतीसाठी धावपळ केली आहे. एका सैनिक पित्याला वाचवण्यासाठी कोणताही परिचय नसणाऱ्या एका तरुणाने रात्री दीड वाजेपर्यंत धावपळ करत सैनिकी पित्याला बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. रात्रीची वेळ असल्यानं मदत करण्यास अनेक अडचणी येत होत्या.

संबंधित घटना पुणे जिल्ह्यातील फलटण येथील आहे. येथील एका सैनिकी पित्याची मध्यरात्री अचानक प्रकृती बिघडली. यावेळी घरात केवळ त्यांची एक मुलगी आणि तिची दोन लहान लेकरं होती. त्यामुळे कोणतीही मदत मिळणं अशक्य झालं होतं. याबाबतची माहिती मलटणमधील प्रसाद कारखानीस यांना कळाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या साह्याने संबंधित सैनिकी कुटुंबीयांना मदत मिळवून दिली आहे. त्यांच्या या कार्यांच सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

हे ही वाचा-Doctor Suicide : रुग्णांना मरताना पाहून कोरोना योद्धा डॉक्टरनेही संपवलं आयुष्य

प्रसाद कारखानीस यांनी 'एका सैनिक पित्याला मदत करावी' असा संदेश आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला. तर दुसरीकडे कोणताही परिचय एक तरुण फलटणमध्ये रात्रभर सर्व रुग्णालये शोधून हतबल झाला होता. तेव्हा सोशल मीडियावरील संदेश पाहून ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रशासनाकडे मदतीची विनंती केली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करून बेड उपलब्ध करून देण्याच आश्वासन दिलं आणि रुग्णास घेऊन येण्यास सांगितलं. एका सैनिकी पित्याला मदत मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर अनेकजण एक कुटुंब म्हणून मदतीला धावले आहेत.

First published:

Tags: Corona patient, Father, Indian army