पुणे, 30 सप्टेंबर : पुणे जिल्ह्याच्या (Pune Shocking News) शिरूर शहरातील आदित्य चोपडा हा 23 वर्षीय तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. अखेर आज पुणे-नगर महामार्गावरील अहमदनगर जिल्ह्यातील वाडेगव्हाण येथील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला असून मृतदेहावर धारधार शास्त्राचे वार असल्याने आदित्यचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आदित्यच्या हत्येने शिरूर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संतप्त नातेवाइकांनी पुणे-नगर महामार्गावर वाडेगव्हाण येथे रास्ता रोको आंदोलन करत या हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली असून आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. (young man from Pune was found 48 hours later in Ahmednagar family was shocked to see the body)
हे ही वाचा-प्राचार्यांच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यानं डोकं आपटून घेतलं; धक्कादायक CCTV फुटेज
आदित्यची हत्या कोणी केली, याचा सध्या तपास सुरू आहे. अद्याप याबाबत नेमकी माहिती मिळाली नाही. तरी यासंदर्भातील तपास सुरू आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या वृत्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वडिलांच्या संपत्तीतून वाटा मिळावा यासाठी भावा-भावांमध्ये (brother ) वादाच्या घटना नेहमी घडत असतात. काही दिवसांपूर्वी पुण्यात अशाच एका वादातून सख्या मोठ्या बहिणीला (sister) पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील औंधममध्ये घडली होती. जखमी महिलेवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील औंध तालुक्यातील अनुसया सोसायटीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. शरद मनोहर पतंगे (वय 45) असं या अटक करण्यात आलेल्या भावाचं नाव आहे. राजश्री मनोहर पतंगे ( वय 48) असं जखमी महिलेचं नाव आहे. राजश्री आणि शरद हे दोघेही सख्ख्ये भाऊ बहिण आहेत. दोघांना आणखी एक भाऊ आहे, असं वृत्त समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Pune