Home /News /pune /

मांजरीला वाचवण्याठी लावली जिवाची बाजी, 80 फूट खोल खाणीत पडला पुण्यातील तरुण

मांजरीला वाचवण्याठी लावली जिवाची बाजी, 80 फूट खोल खाणीत पडला पुण्यातील तरुण

Accident in Pune: पुण्यातील वेताळ टेकडी परिसरातील एका खाणीत पडून एक 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे.

    पुणे, 14 जानेवारी: पुण्यातील (Pune) वेताळ टेकडी (Vetal hill) परिसरातील एका खाणीत पडून एक 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. संबंधित तरुण एका मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न (Accident while saving cat) करत होता. त्याचवेळी त्याता तोल बिघडून तो 70 ते 80 फूट खोल खाणीत पडला आहे. यावेळी घटनास्थळी असणाऱ्या त्याच्या बहिणींनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत. जखमी तरुणाला पाण्यातून बाहेर काढलं आहे. त्याच्यावर जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामदास उभे (वय-24) असं संबंधित युवकाचं नाव असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. जखमी रामदास हा गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास आपल्या दोन बहिणींसोबत वेताळ टेकडीवर फिरण्यासाठी आला होता. यावेळी येथील खाणीच्या टोकावर एक मांजर ओरडताना दिसली. त्यामुळे रामदास मांजरीला वाचवण्यासाठी खाणीच्या टोकावर चढला. तो मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, तोल जाऊन तो 70 ते 80 फूट खोल खाणीत पडला. हेही वाचा-पुण्यात दिवसभरात तब्बल 5571 नवे रुग्ण, 2335 रुग्णांनी कोरोनावर मात या प्रकारानंतर रामदासच्या घाबरलेल्या दोन बहिणींनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने देखील क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी तरुणाला तातडीने पाण्याबाहेर काढलं आहे. त्याला शरीरावर अनेक ठिकाणी मुका मार लागला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तातडीने जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. हेही वाचा-डिवायडर तोडून ट्रकची गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा पुण्यातील LIVE VIDEO अपघाताची ही घटना उघडकीस येताच, परिसरात फिरायला आलेल्या अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. संबंधित तरुणाला खाणीतून सुखरूप बाहेर काढल्याने जमलेल्या गर्दीने सुटकेचा नि:श्वास सोडला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या