मराठी बातम्या /बातम्या /पुणे /तरुणाने डोक्यात गोळी झाडत केली आत्महत्या, पुणे जिल्ह्यातील घटना

तरुणाने डोक्यात गोळी झाडत केली आत्महत्या, पुणे जिल्ह्यातील घटना

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दादा नलगे यांनी डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दादा नलगे यांनी डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दादा नलगे यांनी डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली.

सुमित सोनवणे, दौंड, 2 जानेवारी : पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एका युवकाने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दादा लक्ष्मणराव नलगे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दादा नलगे यांनी आपल्याकडे असणाऱ्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली.

दौंड पोलीस स्टेशन शेजारील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ असणाऱ्या तारामती इमारतीमध्ये दादा नलगे यांनी आत्महत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नलगे यांच्या आत्महत्येची नोंद दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नलगे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पुणे इथं सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत दादा नलगे यांच्या कुटुंबीयांनी दौंड पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी

मयत दादा नलगे यांचे वडील श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Pune (City/Town/Village), Suicide case