Home /News /pune /

समलैंगिक संबंध ठेवण्यास दिला नकार; पिंपरीत तरुणाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

समलैंगिक संबंध ठेवण्यास दिला नकार; पिंपरीत तरुणाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Crime in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरीत (Pimpri) एका तरुणानं समलैंगिक संबंध (Homosexual relation) ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून त्याला मारहाण (Young man beat) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पिंपरी, 27 नोव्हेंबर: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरीत (Pimpri) एका तरुणाला मारहाण (Young man beaten up) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणानं समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार (Victim refused to have same sexual relation) दिल्याच्या कारणातून त्याला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मारहाणीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत. आकाश राजेंद्र भुते असं गुन्हा दाखल झालेल्या 24 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी भुते हा पिंपरीतील महेशनगर परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भुते यानं पीडित तरुणाकडे समलैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. पण फिर्यादीनं समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला. या कारणातून आरोपीनं फिर्यादीला कठीण वस्तूने मारहाण केली आहे. हेही वाचा- मुंबईत 20 वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद कृत्य; टेरेसवर भयावह अवस्थेत आढळली पीडित या मारहाणीत फिर्यादीच्या डाव्या हाताला जखम देखील झाली आबे. तसेच डोक्याला आणि छातीला मुक्कामार देखील लागला आहे. आरोपी केवळ मारहाण करेपर्यंतचं थांबला नाही. तर त्याने पीडित तरुणाचा मोबाइल आणि खिशातील 1800 रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली आहे. संबंधित घटना बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडला आहे. हेही वाचा-मैत्रिणींसमोर 'चरसी' म्हटल्यानं कॉलेज विद्यार्थ्याला मारहाण; तरुणानं संपवलं जीवन ही संतापजनक प्रकार घडल्यानंतर, पीडित तरुणानं भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरुण आकाश भुते याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मारहाण, चोरीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपीवर कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी मारहाण झाल्याचा हा पहिलाच प्रकार घडल्याने पोलीसही हैराण झाले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या