Home /News /pune /

गर्लफ्रेंडसमोर पगार विचारला म्हणून वैतागलेल्या तरुणाने थेट रॉडने केली मारहाण

गर्लफ्रेंडसमोर पगार विचारला म्हणून वैतागलेल्या तरुणाने थेट रॉडने केली मारहाण

हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसमोर पगाराबाबत विचारणा केल्याने वैतागलेल्या तरुणाने समोरच्या व्यक्तीला थेट रॉडने मारहाण केली.

    पुणे, 14 जानेवारी : एखाद्या व्यक्तीला कधी कशाचा राग येईल, याचा नेम नसतो. याचाच प्रत्यय पुण्यातील एका घटनेनंतर पुन्हा आला आहे. कारण हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसमोर पगाराबाबत विचारणा केल्याने वैतागलेल्या तरुणाने समोरच्या व्यक्तीला थेट रॉडने मारहाण केली. याप्रकरणी 28 वर्षांच्या व्यक्तीने येरवडा पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. येरड्यातील शास्त्रीनगर भागतील एका हॉटेलमध्ये अँथनी नावाचा तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत बसला होता. तेव्हा तेथील एक व्यक्ती अँथनीसोबत गप्पा मारू लागला. थोडा वेळ गेल्यानंतर त्या व्यक्तीने सहज बोलता बोलता अँथनीला कुठे काम करतो आणि पगार किती आहे, अशी विचारणा केली. या प्रश्नाने भडकलेल्या अँथनीने थेट त्या व्यक्तीसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. शिक्षिकेनं पेन्सिल घेऊन विद्यार्थिनींवर केले नको ते अत्याचार, व्हिडिओ पाठवला प्रियकराला! अँथनीने नंतर त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी आपल्या भावासह इतर तीन मित्रांना बोलावून घेतलं. त्यानंतर चौघांनी मिळून पगाराबाबत प्रश्न विचारणाऱ्याला रॉडने मारहाण केली. यामध्ये त्या व्यक्तीच्या हाताला आणि पायाला जखम झाली आहे. मारहाण झाल्यानंतर संबधित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली. या मारहाणप्रकरणी, येरवडा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित मोरे (रा़ करण सोसायटी, वडगाव), रॉनी अर्कस्वामी, अँथोनी अर्कस्वामी (दोघे रा़ नामदेवनगर, वडगाव शेरी) आणि नानु (रा़ ताडीवाला रोड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या