पुणे, 13 डिसेंबर : आपल्याला विदेशात नोकरी लागली आहे, असं सांगून इंजिनिअर तरुण पदेशात जाण्यासाठी पुणे विमानतळावर (pune airport) पोहोचला. आई-वडिल विमानतळावरून जाताच या तरुणाने विमातळावरून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी जेव्हा चौकशी केली असता बनावट व्हिसा (fake visa) आणि तिकीट (fake air tick) आढळून आले. त्यामुळे या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,असीम गोगटे (aseem gogate) असं या तरुणाचं नाव आहे, त्याने बि-टेक इंजिनीयरचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षे त्याने परदेशात नोकरी देखील केली. लॉकडाऊन लागण्यापूर्वीच तो भारतात आला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्ष तो घरातच बसून होता. उच्च शिक्षण घेतलेल्या पोरगा घरातच बसून असल्याने सेवानिवृत्त झालेल्या आईवडिलांनी त्याच्या मागे पुन्हा एकदा नोकरी करण्याचा तगादा लावला.
Omicron च्या रुग्णाचा ब्रिटनमध्ये मृत्यू; एप्रिलपर्यंत 75000 जीव घेणार कोरोना?
या काळात त्याने चार ते पाच ठिकाणी नोकरीसाठी मुलाखत ही दिली. मात्र त्याच्या नोकरीच काही काम झालं नाही. शेवटी त्याने बनावट व्हिसा आणि बनावट विमान तिकीट तयार केले आणि आई-वडिलांना कॅनडात नोकरी मिळाल्याचे सांगून तो कॅनडात जाण्यासाठी निघाला. मुलाला नोकरी मिळाल्याचे समजल्यानंतर आई वडील आनंदी झाले. मुलाला सोडण्यासाठी ते पुणे विमानतळावर आले. आई वडिलांना भेटून असीम विमानतळावर गेला. काही वेळ आत घालवल्यानंतर तो बाहेर पडू लागला. परंतु, तेथील सुरक्षारक्षकांनी त्याच्या तिकीट आणि व्हिसाची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
माझी फक्त हीच तक्रार...', मीराच्या बोलण्यावर उत्कर्ष -जय काय म्हणणार?
असीमने परदेशात नोकरीला जात असल्याचे सांगून काही दिवस मित्राकडे राहण्याचा प्लॅन केला होता. यासाठी त्याने घरीच बनावट व्हिसा आणि तिकीट तयार केलं होतं. परंतु, विमानतळावरच त्याचा हा प्लॅन उघडकीस आला. असीम आता पोलीस कोठडीत आहे. एका छोट्याश्या चुकीमुळे संपूर्ण आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.