300 फूट खोल दरीत आढळला तरुणीचा मृतदेह..

300 फूट खोल दरीत आढळला तरुणीचा मृतदेह..

शिवदुर्ग रेस्क्यू टीम मागील तीन दिवसांपासून अलिजाचा शोध घेत होती. अखेर लायन्स पॉईंटच्या खोल दरीमध्ये 300 फुटावर रविवारी अलिजाचा मृतदेह आढळून आला.

  • Share this:

अनिंस शेख,(प्रतिनिधी)

लोणावळा, 15 सप्टेंबर: लोणावळा येथील लायन्स पॉइंटच्या 300 फूट खोल दरीत तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अलिजा राणा (वय-24) अशी मृत तरुणीची ओळख पटली आहे. 12 सप्टेंबरला अलिजाची पर्स एका दगडाच्या कठड्यावर पोलिसांना सापडली होती. अलिजा हिने खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.

तीन दिवसांपासून सुरू होता शोध...

शिवदुर्ग रेस्क्यू टीम मागील तीन दिवसांपासून अलिजाचा शोध घेत होती. अखेर लायन्स पॉईंटच्या खोल दरीमध्ये 300 फुटावर रविवारी अलिजाचा मृतदेह आढळून आला. दोरीच्या साह्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.

तरुणाला जंगलात नेऊन मारण्याची धमकी..

Loading...

दरम्यान, परराज्यातील तरुणाला एक लाख रुपयांची खंडणी तसेच जंगलात नेऊन मारण्याची धमकी दिल्यामुळे तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड तसेच पुणे परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये अॅडमिशन करून देण्याचे काम करणाऱ्या परराज्यातील तरुणाला तिघांनी शस्त्राचा धाक दाखवून एक लाख रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु ही घटना वेळ असताच पोलिसांना माहित पडल्याने तरुणाचा थोडक्यात जीव वाचला. या घटनेप्रकरणी आकाश मिश्रा याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संकल्प पगारे, योगेश बुरकुंडे, शुभम चव्हाण या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून एक धारदार कोयताही जप्त करण्यात आलेला आहे.

काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2019 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...