पुणे, 22 मार्च : सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची फसवणूक करता. त्यात काही क्षणात लाखोंची फसवणूक केली जाते. आता पुण्यात एका महिलेला क्रेडीट कार्ड काढून देतो असं सांगत एका भामट्या तरुणीने तब्बल ३ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
महिलेकडून कार्डची गोपनीय माहिती घेत परस्पर सहा आय़फोन खरेदी केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणीवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा अविनाश चौरे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी संगिता हनुमंत गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या काळात हा प्रकार घडला.
महामार्गात ठरतेय अडथळा, पुण्यात इमारत सरकवण्यात येतेय 9 फूट मागे
प्रतिश्राने संगिता यांना आयडीएफसी बँकेचं क्रेडिट कार्ड काढून देते असं सांगितलं होतं. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल असं सांगून तो घेतला. त्यांच्या खात्यातून वेळोवेळी २ लाख ७० हजार रुपये किंमतीचे आयफोन लोन घेतले. तक्रारदार महिलेच्या नावे तरुणीने परस्पर ही खरेदी केली. तर महिलेच्या मित्राच्या नावावरही दोन आयफोन घेतले. असे एकूण ३ लाख ९१ हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune