शरद पवारांची ऐवढी काळजी कोणीच घेतली नसेल, तरुण शेतकऱ्याने केला 200 किमी प्रवास आणि...

शरद पवारांची ऐवढी काळजी कोणीच घेतली नसेल, तरुण शेतकऱ्याने केला 200 किमी प्रवास आणि...

नेत्यांच्या एका इशाऱ्यावर कृती करणारे आणि त्यातून आव्हान केल्यावर क्षणात त्यांची कृती थांबवणारे कार्यकर्ते देशाने पाहिले आहेत.

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

पुणे, 30 नोव्हेंबर : नेते आणि कार्यकर्ते यांचे नाते अनेकदा रक्ताच्या नात्यापलीकडे असते. नेत्यांच्या एका इशाऱ्यावर कृती करणारे आणि त्यातून आव्हान केल्यावर क्षणात त्यांची कृती थांबवणारे कार्यकर्ते देशाने पाहिले आहेत. मात्र, त्यापलीकडे जाऊन आपल्या लाडक्या नेत्याला ताजा भाजीपाला मिळावा म्हणून 200 किलोमीटर अंतर दुचाकीवर पार करणारा कार्यकर्ता समोर आला आहे. शरद पवारांना ताजा भाजीपाला घेऊन थेट मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर हा कार्यकर्ता पोहचला आणि पवारांनी त्यांचं कौतुक ट्विटरच्या माध्यमातून केले.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तसलुक्यातील केंदुर गावचा सुनील सुक्रे हा तरुण नुकताच दुचाकीवरून दोनशे किलोमीटरचा प्रवास करून आपल्या शेतातील ताजा भाजीपाला पवारांच्या सिल्वर ओक निवास्थानी घेऊन पोचला. मात्र, सिल्वर ओक येथे राजकीय घडामोडींच्या गडबडी सुरू असतानाही या शेतकऱ्याच्या पुत्राला शरद पवार आवर्जून भेटले. या तरुणाने आणलेला भाजीपाला स्वीकारला आणि त्याचे आभार व्यक्त करत त्याचे फोटो ट्विटरवर टाकून या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

राज्यात शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून शरद पवारांकडे शेतकरी बळीराजा पाहत आहे. ज्या-ज्या वेळी शेतकरी अडचणीत असेल त्या त्यावेळी शरद पवारांनी या बळीराजाची हाक ऐकून, शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना उभारी दिली. याचीच परतफेड करण्यासाठी हा तरुण मुंबईत पोहचला. राज्यात सत्तास्थापनेची गणित सुरू असताना वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवारांची ही धावपळ या शेतकऱ्याला पहाविनाशी झाली. त्यामुळे या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात पिकलेला शेतमाल तरकारी माल अशा विविध भाज्या थेट मुंबईला दुचाकीवर जाऊन पवारांच्या घरी दिला.

या तरुण शेतकऱ्याचे प्रेम पाहून शरद पवारदेखील भावूक झाले. राज्यातील शेतकरी हा आपल्यावर एवढ प्रेम करुन प्रत्यक्षात हा शेतकरी तरुण मुलगा घरी भाजीपाला घेऊन आल्यावर पवारांनी या शेतकऱ्याचे आभार मानत ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.

इतर बातम्या - VIDEO: भगव्या रंगाच्या कुर्त्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्यव्य, म्हणाले...!

गेल्या महिन्याभरापासून शरद पवार राज्यात घडत असणाऱ्या राजकीय घडामोडींवर दिवस-रात्र विरोधकांचा संघर्ष करताना पवार साहेबांना राज्यातील प्रत्येक नागरिक पाहत आहे. वयाच्या 80 व्या वर्षी हा आपला नेता शेतकऱ्यांसाठी लढतोय ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आपल्या नेत्याला शेतात पिकवलेला ताजा भाजीपाला देऊन आपली नैतिक जबाबदारी आहे. हे समजून सुनील शुक्रे या तरुणाने पहाटे भाजीपाला तरकारी माल अशा विविध भाज्या काढून दुचाकीवरून निघुन थेट पवार साहेबांच्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहचला.

यावेळी त्याला जितेंद्र आव्हाड भेटले त्यानंतर शदर पवारांनी त्याची मेहनत पाहून त्याचे आभार मानले आणि शेतकऱ्यांना पुढील काळात योग्य न्याय देण्याचे आश्वासन यावेळी दिल्याचं सुनील सुक्रे या तरुणाने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 03:51 PM IST

ताज्या बातम्या