S M L

लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात

लोणावळ्याच्या तुंगार्ली धरण परिसरात प्रियेसी सोबत फिरायला गेलेला महाविद्यालयीन विद्य‍ार्थी किसन शिवा परदेशी याचा मंगळवारी सायंकाळी हाताने व दगडाने मारुन खुन करण्यात आला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 24, 2018 11:10 AM IST

लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात

14 मार्च : लोणावळ्याच्या तुंगार्ली धरण परिसरात प्रियेसी सोबत फिरायला गेलेला महाविद्यालयीन विद्य‍ार्थी किसन शिवा परदेशी याचा मंगळवारी सायंकाळी हाताने व दगडाने मारुन खुन करण्यात आला आहे. खुनानंतर पुरावा नष्ट करण्य‍ाच्या हेतूने त्याचा मृतदेह तुंगार्ली धरणाच्या पाण्यात फेकून देण्यात आला होता.

या प्रकरणी मृत युवकाचा चुलता भरत मिठाईलाल परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत विठ्ठल धरफळे याच्यावर भादंवी कलम ३०२, २०१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास किसन परदेशी हा आपल्या घेऊन तुंगार्ली धरणावर फिरायला गेला होता. ही माहिती समजल्यावर या प्रकरणातील आरोपी प्रशांत धरपाळे हा मनात राग धरून घटनास्थळी पोचला. त्याने त्या ठिकाणी किसन परदेशी याला हाताने आणि दगडाने मारहाण करीत त्याचा खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात टाकला.किसन याचा मृतदेह बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शिवदुर्ग मित्र या संस्थेच्या बचाव पथकाने पाण्यातून बाहेर काढला.

याप्रकरणी धरपाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.बी.रानगट हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 09:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close