दहिहंडीची बॅनरबाजी भोवली, तरुणावर तलावारीने केले वार

पुण्याच्या सिंहगड रोड भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. दहिहंडीच्या बॅनर लावण्याच्या वादातून तरूणाचा खून करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2018 01:33 PM IST

दहिहंडीची बॅनरबाजी भोवली, तरुणावर तलावारीने केले वार

पुणे, 01 सप्टेंबर : पुण्याच्या सिंहगड रोड भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. दहिहंडीच्या बॅनर लावण्याच्या वादातून तरूणाचा खून करण्यात आला आहे. अक्षय हडशी असं या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहिहांडी या उत्सवासाठी जागोजागी बॅनर लावले जातात पण आता हीच बॅनरबाजी पुण्यात अक्षयच्या जीवावर बेतली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये दहिहंडीच्या बॅनरवरून वाद सुरू होता. त्याचाच राग म्हणून काल रात्री दीड वाजता मानिक बाद कॉलनी सिंहगडरोड जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ काही तरूणांनी अक्षयवर तलवारीने वार केले आणि तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अक्षयची ओळख पटवून घेत या घटनेबद्दल त्याच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं.

दरम्यान, पोलिसांनी 3 जणांना हत्या केल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं आहे. अक्षयचा खून नेमका का केला, त्याला मारण्यामागे किती जणांचा हात आहे, या सगळ्याचा पोलीस आता तपास घेत आहे.

VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2018 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close