एका सिगारेटने मैत्रीची झाली राख, 4 अल्पवयीन मुलांनी एकाला केलं ठार!

एका सिगारेटने मैत्रीची झाली राख, 4 अल्पवयीन मुलांनी एकाला केलं ठार!

सगळे मित्र एकत्र बसले असताना एकाला सिगारेट आणायला सांगण्यात आलं. पण त्यावरून मित्रांमध्ये वाद झाला आणि चौघांनी एका तरुणाची हत्या केली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 22 सप्टेंबर : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिगारेट घेऊन आला नाही म्हणून एका तरुणाची चौघांकडून हत्या करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर म्हणजे ज्या मुलांनी हत्या केली ती अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हत्येच्या या प्रकरणात पोलिसांनी 4 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर पुढील तपास सुरू आहे.

सगळे मित्र एकत्र बसले असताना एकाला सिगारेट आणायला सांगण्यात आलं. पण त्यावरून मित्रांमध्ये वाद झाला आणि चौघांनी एका तरुणाची हत्या केली. शाम्य खंडागळे असं मृत तरुणाचं नाव आहे. आकाश खरात, विजय सावंतसह आणखी 2 अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. खरंतर मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती आहे.

हत्या झाल्यानंतर आरोपींनी पळ काढला. पण पोलिसांनी शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं आहे. या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस आरोंपींची कसून चौकशी करत आहेत. गेल्या काही दिवसांआधीच थेऊरमध्ये एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

इतर बातम्या - पिंपरी चिंचवडकरांनो, हे आहेत तुमचे नवीन पोलीस आयुक्त!

रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने मारेकऱ्यांना अटक केलं होतं. शुक्रवारी (20 सप्टेंबर) पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास थेऊर गावातील हेड कॉन्सटेबल संदीप सुरेश देवकर हे आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत खासगी वाहनाने रात्री गस्तीवर होते. एका दुचाकीवर चार जण जात असल्याचे त्यांना दिसले. यावेळी गाडीवरील एक व्यक्तीचे डोके प्लास्टिक गोणीने झाकले होते आणि त्याच्या अंगावर रक्तही दिसत होते. हा प्रकार पाहून हेड कॉन्सटेबल देवकर यांना शंका आली. त्यांनी सोबत असलेल्या 2 होमगार्डच्या मदतीने त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे समजताच आरोपींनी थेऊर फाट्याजवळ गोणीने झाकलेल्या व्यक्तीला टाकून तेथून पळ काढला. त्यानंतर देवकर यांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करत आरोपींना पकडले.

इतर बातम्या- युती 100 टक्के होणार पण 'या' मुद्द्यावरून भाजप सेनेला झुकवणार!

चौकशीत सत्य आले समोर..

येरवडा परिसरातील संगमवाडी रोडवर किरकोळ कारणावरुन मृत भारत राजू बढे (वय- 24., रा. कासारवाडी, पुणे) याला दगडाने ठेचून खून केल्याचे मारेकऱ्यांनी कबूल केले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अशोक संतोष आडवाणी (वय-22, रा. पिंपरी, पुणे ), अक्षय दिलीप पवार (वय-19, रा. वरवंट,दौंड) आणि विजय संतोष पवार (वय-19, रा. वरवंट, दौंड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

 

Published by: Renuka Dhaybar
First published: September 22, 2019, 11:49 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading