'तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा, आम्ही आमचं सांभाळतो', फडणवीसांनी उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

'तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा, आम्ही आमचं सांभाळतो', फडणवीसांनी उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

'कोविडच्या काळात देशातील मंत्री, मुख्यमंत्री जेव्हा मोदींवर टीका करत होते, तेव्हा ते जनतेच्या सेवेत होते, पंतप्रधान मोदी हे कर्मयोगी आहेत. लोकांना बोलघेवडे आवडत नाहीत'

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 25 नोव्हेंबर : 'कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने समाजातील कोणत्याही घटकाला मदत केली नाही, इतर राज्यांनी आर्थिक पॅकेज दिले आहे.  केवळ तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा, आम्ही आमचं सांभाळतो एवढेच काम केलं' अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.

पिंपरी चिंचवडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी फडणवीस यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी', या शासकीय योजनेची खिल्ली उडवली.

इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणाच्या सुनावणीला नवे वळण

'कोविडच्या काळात देशातील मंत्री, मुख्यमंत्री जेव्हा मोदींवर टीका करत होते, तेव्हा ते जनतेच्या सेवेत होते, पंतप्रधान मोदी हे कर्मयोगी आहेत. लोकांना बोलघेवडे आवडत नाहीत.  इतर राज्यांनी आर्थिक पॅकेज दिले आहे.  केवळ तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा, आम्ही आमचं सांभाळतो एवढेच काम केलं' असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

ठाकरे सरकार वेगवेगळ्या घोषणा करते आणि घोषणेवरून मग जाते. त्यामुळे हे सरकार पलटूराम सरकार आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ

'वर्षभरात केवळ स्थगित्या देणं आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करून माल कमविणे एवढेच या सरकारचे काम सुरू आहे', असा आरोपही फडणवीस यांनी केला.

तर 2019 पर्यंत निसर्ग आणि जनतेचाही विश्वास होता, पण काही लोकांनी आपल्याला फसवलं आणि अ-नैसर्गिक सरकार स्थापन केले. त्यांना आपण या विधान परिषदेच्या निवडणुकीत उत्तर देऊ, असा टोला भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना लगावला.

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 1:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या