Home /News /pune /

पुणे: येरवडा कारागृहात पोलिसानं स्वत:च्या कपाळावर झाडली गोळी, भल्या पहाटे घडला थरार

पुणे: येरवडा कारागृहात पोलिसानं स्वत:च्या कपाळावर झाडली गोळी, भल्या पहाटे घडला थरार

Crime in Pune: पुण्यातील येरवडा कारागृहातील पोलीस शिपायानं स्वत:वर गोळी झाडून (Police shoot himself) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित पोलिसांनी कर्तव्यावर असताना आज पहाटे स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे.

    पुणे, 27 फेब्रुवारी: पुण्यातील (Pune) येरवडा कारागृहातील (Yerawada central jail) पोलीस शिपायानं स्वत:वर गोळी झाडून (Police shoot himself) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित पोलिसांनी कर्तव्यावर असताना आज पहाटे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to commit suicide) केला आहे. भल्या पहाटे ही थरारक घटना घडताच सहकारी पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती नाजूक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. येरवडा पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास केला जात आहे. अमोल माने असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचं नाव असून ते येरवडा कारागृह वसाहतीत वास्तव्याला होते. जखमी अमोल माने हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. 2015 साली ते कारागृह पोलीस म्हणून भरती झाले होते. तेव्हापासून ते येथेच कार्यरत होते. दरम्यान काल देखील त्यांची ड्युटी होती. कर्तव्यावर असताना त्यांनी पहाटे चारच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. हेही वाचा-विरारमध्ये भरदिवसा तरुणावर झाडल्या गोळ्या, शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल पोलीस शिपाई अमोल यांनी स्वत: कडील एसएलआर रायफलमधून डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडून घेतली आहे. भल्या पहाटे गोळीबाराचा हा थरार घडताच सहकारी पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. हेही वाचा-आई आत्महत्या करत होती अन् मुलाला कळालंही नाही, बुलडाण्यात ग्रामसेविकेनं दिला जीव घरगुती कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचचलं असावं, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयात धाव घेत, अमोल माने यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Suicide

    पुढील बातम्या