Home /News /pune /

Yaas Cyclone : पुण्यात ढगाळ वातावरण, जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचीही शक्यता, चक्रीवादळ बुधवारी धडकणार

Yaas Cyclone : पुण्यात ढगाळ वातावरण, जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचीही शक्यता, चक्रीवादळ बुधवारी धडकणार

Yaas effect on maharashtra हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार यास चक्रीवादळ पुढच्या 24 तासांमध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळं अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

    पुणे, 25 मे : तौक्ते चक्रिवादळाच्या (Tauktae) तडाख्यातून पूर्णपणे सावरण्याआधीच देशावर आणखी एका चक्रिवादळाचं संकट आलं आहे. यास चक्रीवादळ (Yaas Cyclone) हे देशात धडकलं आहे. या चक्रीवादळाचा तडाखा प्रामुख्यानं पश्चिम बंगाल (West bengal) आणि ओडिशा (Odisha) राज्याला बसणार आहे. असं असलं तरी राज्यात काही ठिकाणी याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. त्यापैकी पुण्यात (Pune) हवा आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (वाचा-SPECIAL REPORT : पुण्यातील कोरोनाची दुसरी लाट नेमकी कशी आटोक्यात आली?) राज्याचा विचार करता यास चक्रीवादळाचा परिणाम काही ठिकाणी दिसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात प्रामुख्यानं पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात खेड, पुरंदर, हवेली आणि पुणे तालुक्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात काही भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार यास चक्रीवादळ पुढच्या 24 तासांमध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळं अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं यास चक्रीवादळात (Yaas Cyclone) रुपांतर झालं आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 26 तारखेच्या पहाटेपर्यंत 'यास' चक्रीवादळ उत्तर ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा देणार आहे. त्यावेळी या वाऱ्याची गती 160 किलोमीटर पर्यंत वाढलेली असेल असा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (वाचा-Pune : हत्या झालेल्या 75 वर्षीय वृद्धेवर हत्येपूर्वी आणि नंतरही लैंगिक अत्याचार) यासाठी वादळाचं नाव 'यास' ठेवलं येत्या 72 तासात भीषण वादळाचा रुप बदलून चक्रीवादळात रुपांतरित झालं तर त्याचं नाव Yaas असेल. हे नाव ओमानने दिलं आहे. ओमानने स्थानिक स्थानिक बोलीच्या आधारावर हे नाव दिलं आहे. यास याचा अर्थ निराश असा होता. यास चक्रीवादळ हे तौत्के चक्रीवादळाच्या तुलनेत अधिक घातक आहे. या वादळाची स्वतः भोवती फिरण्याची गती प्रचंड वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यास चक्रीवादळामुळे सध्या ओडिशातील किनारपट्टीच्या बहुतांशी भागात सुसाट वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशातील चंद्रभागा आणि कोणार्क याठिकाणी पावसाची स्थिती आणखीच भयंकर बनत चालली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Pune, Pune news

    पुढील बातम्या