आंबेडकर आणि गांधींबद्दल प्रचार चुकीचा-भाई वैद्य

आंबेडकर आणि गांधींबद्दल प्रचार चुकीचा-भाई वैद्य

"शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार करायचा की संघप्रणीत धर्मनिष्टीत राष्ट्रवादाचा विचार करायचा हा प्रश्न भारतीय समाजासमोर आहे. पण समाज हिंदवी स्वराज्याचा विचार करेल"

  • Share this:

हलिमा कुरेशी, पुणे

21 जून : बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात दरी निर्माण  करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय तो चुकीचा आहे. जे याबाबत प्रचार करत आहेत त्यांनी सुधारणा करावी असं आवाहन आणि चिंता ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केली. भाई वैद्य नव्वदीच्या गौरव सोहळ्यात पदार्पण करत असल्याच्या निमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार करायचा की संघप्रणीत धर्मनिष्टीत राष्ट्रवादाचा विचार करायचा हा प्रश्न भारतीय समाजासमोर आहे. पण समाज हिंदवी स्वराज्याचा विचार करेल अशी मला खात्री आहे. मोदींची पत्रिका महत्वाची नाही. खरी पत्रिका १९२५ साली आलीये अशी टीका भाई वैद्य यांनी केली.

तसंच बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात दरी निर्माण  करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय तो चुकीचा आहे. जे याबाबत प्रचार करत आहेत त्यांनी सुधारणा करावी.  एलिनार जेलीएट या स्कॉलरने बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मोठं संशोधन केलं. त्यानं लिहिलेल्या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचं कार्य परस्पर पूरक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री मंत्री शरद पवार यांनी गौरव उद्गार काढले. भाई गृह राज्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम आणि स्वच्छ चारित्र्याची प्रतिमा जातीआणि धर्मविरहित राजकारण्याबद्दल किस्से आणि आठवणीत सभागृह नाहून निघालं.

भाई वैद्य गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणी, नामांतर या सगळ्यात सक्रिय होते. ना.ग.गोरे, एसेम यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. राष्ट्रसेवा दलातून त्यांनी समाजवादी विचारांचा वारसा चालवला. असं गौरव उद्गार माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 10:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading