अजित पवारांची ‘चकवा स्टाईल’, दादांच्या कामाची ही आहे Inside Story!

अजित पवारांची ‘चकवा स्टाईल’, दादांच्या कामाची ही आहे Inside Story!

ते झाल्यावर त्यांनी विचारलं की आपल्याला 1 हजार बेडचं तातडीने हॉस्पिटल उभारायचं आहे. त्यासाठी किती पैसे लागतील? 200 कोटींमध्ये होईल का? मी पैसे मंजूर करतो.

  • Share this:

पुणे 24 मे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काम करण्याची एक स्टाईल आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. मात्र त्यांची ही स्टाईल कधी बदलली नाही. स्पष्टवक्तेपणामुळे त्यांची प्रतिमा फटकळ अशी निर्माण झाली. त्यामुळे माध्यमांपासून ते कायम चार हात लांबच राहतात. पुण्याचे पालमंत्री या नात्याने ते कोरोनाविषयक सातत्याने बैठका घेत आहेत. मात्र गेले काही दिवस अजित पवार गायब असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्याने दादा नेमके कुठे आहेत याचा वेध आम्ही घेतला तेव्हा पुन्हा एकदा अजित पवारांची चकवा स्टाईल पुढे आली.

अजित पवारांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात काही पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. नंतर सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा प्रकोप वाढल्याने त्यांनी बैठकांची फारशी वाच्यता होणार नाही याची काळजी घेतली. ते सकाळी 7 वाजताच अधिकाऱ्यांना बोलावून बैठका घेत आणि कामाचा आढावा घेतला जात असे. त्यांच्या या बैठकांची माहिती कार्यकर्त्यांनाही दिली जात नव्हती.

काही दिवसांपूर्वी त्यांनी सकाळी 7 वाजता पहिली बैठक घेतली होती.शनिवारी त्यांनी स्मार्ट सिटीला कोरोनाचं सगळं प्रेझेंटेशन पाहिलं. त्यांच्यावर माध्यामांमधून टीका ही झाली की पालकमंत्री गायब आहेत म्हणून. तरीही ते सकाळीच बैठका घेऊन बैठकांची माहिती कुणालाच कळू द्यायच नाही अशी तंबीही द्यायचे.

हे आमचं नाही तर शिवसेनेचं सरकार, पृथ्विराज चव्हाणांची ऑडिओ क्लिप व्हायरल

शनिवारी प्रेझेंटेशन संपल्यावर त्यांना पत्रकारांनी बोळण्याची विनंती केली. मात्र आता बोलणार नाही कोरोनाचा प्रकोप शांत झाल्यावरच बोलणार असं सांगत त्यांनी काढता पाय घेतला.  त्यावेळी त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरं अशी आहेत...

प्रश्न - दादा मीडियाशी कधी बोलणार?

उत्तर - कोरोना संपल्यावर

प्रश्न - तो संपणार नाही, आता सोबत रहायचं असं म्हणतात?

उत्तर – नाही तसं नाही. संपेलच तो.

प्रश्न - दोन मिनिटे बोला

उत्तर - जो माणूस महिना महिना इथं येत नाही तो काय बोलणार? (उपहासाने)

प्रश्न - स्थिती कंट्रोल मध्ये आहे का?

उत्तर - म्हैसेकर रोज प्रेस घेऊन सांगतात की तुम्हाला.

प्रश्न - दादा तुम्ही एकदा पण बोलला नाहीत दोन महिन्यात.

उत्तर - तो माईक तिकड घ्या, त्यानी कोरोना होतो.

मी चाललो  आता...

होमिओपॅथी औषधांनी केली कमाल! अगदी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण

बैठकीत काय झालं?

पाऊणतास बारीक सारीक प्रश्न विचारत अजित पवारांनी प्रेझेंटेशन पाहिलं. प्रेझेंटेशनच्या फोटोत फिजिकल डिस्टन्सिंग नव्हतं म्हणून त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना फैलावर घेतलं. ते झाल्यावर त्यांनी विचारलं की आपल्याला 1 हजार बेडचं तातडीने हॉस्पिटल उभारायचं आहे. त्यासाठी किती पैसे लागतील? 200 कोटींमध्ये होईल का? मी पैसे मंजूर करतो. तयारी सुरू करा असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

माध्यमं हे फक्त नकारात्मक बातम्याच दाखवतात अशा चांगल्या गोष्टी दाखवत नाहीत असं ते म्हणाले.

 

First published: May 24, 2020, 6:58 PM IST
Tags: ajit pawar

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading