मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Women's Day 2021 : पुणे जिल्ह्यातील शासकीय व्यवस्थेत 8 मार्चपासून होणार 'हा' महत्त्वपूर्ण बदल

Women's Day 2021 : पुणे जिल्ह्यातील शासकीय व्यवस्थेत 8 मार्चपासून होणार 'हा' महत्त्वपूर्ण बदल

Women's Day 2021 : पुण्यात (Pune) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे.

Women's Day 2021 : पुण्यात (Pune) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे.

Women's Day 2021 : पुण्यात (Pune) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole

पुणे, 8 मार्च : जगभरात 8 मार्च हा दिवस महिला दिन (Women's Day 2021) म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत पुण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. महिला अनेक क्षेत्रांमध्ये आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. परंतु निसर्गतः महिला शारीरिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा भिन्न आहेत. त्यांना मासिक पाळीच्या कालावधीतही काम करावे लागते. या काळात 8 ते 10 तास सलग शारीरिक अथवा मानसिक श्रमाचे काम करणे महिलांसाठी खूप अवघड असते.

मासिक पाळीच्या वेळी बहुतेक स्त्रिया किरकोळ वेदना अनुभवतात; परंतु जर वेदना तीव्र असेल तर ती सामान्य क्रियाकलापांमध्ये व्यत्यय आणते. काही महिलांना पाळीच्या आधीच्या दिवसांत वेदना जाणवते तर काहींना पाळीदरम्यान डिस्मेनोरिया होतो. ओटीपोटात वेदना, अतिसार, डोकेदुखी, मळमळ, पाय दुखणे, थकवा, अशक्तपणा, उलट्या होणे अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. महिलांची ही गरज ओळखून पुणे जिल्ह्यात महिलांना मासिक पाळीच्या दिवसांतही काम करणे सोयीचे व्हावे, यासाठी त्यांना मदत म्हणून पुणे जिल्हा परिषदेत व सर्व पंचायत समित्यांमध्ये सखी कक्षाची स्थापना करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - दारात बापाचा मृतदेह असताना पुण्याच्या मंगलने दिली CA ची परीक्षा; कुटुंब सांभाळण्यासाठी मोठा संघर्ष

महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आलं होते. या सभेमध्ये एकूण 125 महिला व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या सभेत काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.

महिलांना मासिक पाळीच्या काळात काम करणे शक्य व्हावे म्हणून सखी कक्ष (वुमन फ्रेंडली रूम) उभारण्यात यावा. महिला कर्मचाऱ्यांसाठी तक्रार पेटी असावी. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी वाहतूक व्यवस्था असावी. महिला कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य तपासणीचे आयोजन व विशेष मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करावे. जिल्हा परिषद आवारात पाळणाघर तयार करणे. महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह असावे. महिलांसाठी विविध कार्यक्रम अथवा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, अशा बाबींची मागणी महिलांनी केली होती.

या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तात्काळ कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलांसाठी सखी कक्ष स्थापन करण्यात येत आहे.

First published:

Tags: Pune (City/Town/Village)