मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Women's day पुण्याच्या काठीवाल्या शांताबाईंनी दिल्लीत स्वीकारला सत्कार, तिथंही लाठी चालवत मिळवली दाद!

Women's day पुण्याच्या काठीवाल्या शांताबाईंनी दिल्लीत स्वीकारला सत्कार, तिथंही लाठी चालवत मिळवली दाद!

कोरोनाकाळात व्हायरल झालेल्या पुण्याच्या शांताबाई पवार आठवतात? सत्कार घ्यायला गेल्या आणि दिल्ली गाजवून आल्या.

कोरोनाकाळात व्हायरल झालेल्या पुण्याच्या शांताबाई पवार आठवतात? सत्कार घ्यायला गेल्या आणि दिल्ली गाजवून आल्या.

कोरोनाकाळात व्हायरल झालेल्या पुण्याच्या शांताबाई पवार आठवतात? सत्कार घ्यायला गेल्या आणि दिल्ली गाजवून आल्या.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 8 मार्च : सोशल मीडियावर आल्या दिवशी काहीतरी अनोखी गोष्ट व्हायरल होत असते. पण त्यातल्या कमीच गोष्टी कायम मनावर कोरल्या जातात. (women's day 2021) यंदाच्या अशीच एक गोष्ट म्हणजे ऐन लॉकडाउनच्या काळात व्हायरल झालेला एका अवलिया आजींचा व्हिडिओ. या आजी म्हणजे शांताबाई पवार. 85 वर्षांच्या शांताबाई कोरोनाच्या काळात पुण्याच्या रस्त्यावर उतरल्या त्या हातात काठी घेऊन. उपजीविका भागवण्यासाठी त्यांनी काठीच्या माध्यमातून केलेले साहसी खेळ रस्त्यावरच्या प्रेक्षकांसह नेटकऱ्यांनाही भारावून टाकणारे होते. (women's day news)

हडपसरला राहणाऱ्या आजी प्रचंड व्हायरल झाल्या. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर लोकांनी त्यांचे व्हिडिओ शेअर करत जिगरबाज कर्तृत्व आणि फिटनेसचं कौतुक केलं. आजी वयाच्या आठव्या वर्षांपासून हे करत आल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं या धाडसी आजींचा दिल्लीत भव्य सत्कार झाला. या सत्कारावेळीही आजींनी डोळ्यांचं पारणं फेडणारी काठी घुमवलीच! (Shantabai pawar viral video)

हेही वाचा महिला दिनादिवशी मोठी घोषणा, विद्यार्थिनींना मिळणार मोफत बस सेवा

दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते शांताबाईंना सन्मानित केलं गेलं. दिल्ली महिला आयोगातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. भव्य सोहळ्यात सत्कार स्वीकारल्यानंतर आजीनं लाठीकाठीचा खेळ दाखवत उपस्थितांची पुन्हा एकदा दाद मिळवली. ( shantabai pawar delhi news)

मनोगत मांडतांना शांताबाई म्हणाल्या, 'मी सध्या 10 अनाथ मुलींना शिकवते आहे. त्यांना या जगात कुणीच नाही. ही काठी फिरवून मी थोडेबहुत पैसे मिळवते. माझ्यामागं उभं राहणारं कुणीच नाही. स्वतः कमावते आणि या मुलींनाही उभं करते. याआधी मी कधी विमानातही बसले नाही. मला सत्कारासाठी दिल्लीला बोलावलं गेलं आणि पहिल्यांदा विमानात बसायला मिळालं. (shantabai pawar honored by Kejriwal)

हेही वाचा Women's Day 2021: सावित्रीच्या लेकीची प्रेरणादायी कथा, गावात आणली समृद्धी

शांताबाईंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अभिनेता सोनू सूद यानं त्यांना मार्शल आर्ट आणि सेल्फ डिफेन्स अकॅडमी सुरू करून दिली. आजीनी खूष होत त्या अकॅडमीचं नावही या अभिनेत्याच्या नावावरच ठेवलं. सोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही खास पुण्याला जात शांताबाईंना 1 लाख रुपये आणि साडी देत त्यांचा सत्कार केला होता.(Pune shantabai pawar womens day news)

First published:

Tags: Anil deshmukh, Arvind kejriwal, Pune, Viral video., Womens day