पुणे, 12 सप्टेंबर : कोरोनासारख्या जीवघेण्या संकटामुळे जनजीवनच बदललं आहे. कोरोना म्हणजे माणूसकीची परीक्षा आहे. या काळात अनेक धक्कादायक प्रकरणं समोर आली असताना सगळ्यांनी या महिलांचा आदर्श घ्यावा अशी एक घटना पुण्यात घडली आहे. शिरुर तालुक्यातील रांजणगावात 82 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. परंतु त्यांना कोरोना झाला असेल या भीतीने कोणतेच नातेवाईक त्यांच्या जवळ आले नाहीत. घरात कोणीच कर्ता पुरुष नाही. नातवंडे लहान दोन सुना, दोन लेकी आणि एक नात असं कुटुंब. अशा वेळी ज्या सासऱ्यांनी आयुष्यभर कष्ट करुन संसार फुलवला त्यांच्या अंत्यविधीला खांदा देण्यासाठी अखेर घरातील स्त्रिया पुढे आल्या.
...तर पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू होणार का? अजित पवारांची महत्त्वाची सूचना
काहीही झालं तरी आजोबांचा अंत्यविधी हा त्यांच्या गावातच करायचा. अशात रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे अगदी देवदुत बनुन धावून आले. त्यांनी संबंधित डॉक्टरांना वृद्ध व्यक्तीची कोरोना चाचणी करायला सांगितली. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर एक पोलीस आणि दोन कर्मचारी त्या कुटुंबाच्या मदतीला पाठवले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या सहकार्यामुळे 2 मुली, 2 सुना आणि नात यांनी वृद्ध व्यक्तीचा अंत्यविधी करत सामाज्यात एक वेगळा पायंडा पाडला.
मुंबईत पुढच्या 3-4 आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना, महापालिकेने दिली माहिती
नामदेव सखाराम खेडकर असं वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. 8 सप्टेंबरला गावातील खाजगी दवाखान्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु कोरोनाच्या भीतीने कोणीही दवाखान्यात आलं नाही. काही जवळचे नातेवाईक आले पण अंत्यविधी घरी करु नका त्यापेक्षा डॉक्टरांना सांगा ते अंत्यविधी करतील असा सल्ला देऊन निघुन गेले. त्यामुळे नामदेव खेडकर यांचा मृतदेह 5 ते 6 तास दवाखान्यातच पडून होता. अखेर घरातील स्त्रियांनी पुढे येत नामदेव यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
रियाने चौकशीत घेतली 2 स्टार अभिनेत्यांची नावं, सुशांतच्या डॅग्ज पार्टीचा खुलासा
कोरोनामुळे माणुसकी हरवत चालली आहे का...?
सध्या शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असुन कोरोनाबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे "कोरोना बाधित" रुग्णाच्या कुटुंबियांना किंवा "कोरोना बाधित" व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही गावात एखादा व्यक्ती कोणत्याही आजारामुळे जर दवाखान्यात अॅडमिट झाला तर गावातील काही लोक त्याला "कोरोना" झाल्याच्या अफवा गावात पसरवतात त्यामुळे त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना संपूर्ण गावच वाळीत टाकत अशा अनेक घटना शिरुर तालुक्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्या लोकांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे.