Home /News /pune /

दौंडमधील महिला झाल्या 'लोकल टू ग्लोबल'; Amazon वर केली गोवऱ्यांची ऑनलाइन विक्री

दौंडमधील महिला झाल्या 'लोकल टू ग्लोबल'; Amazon वर केली गोवऱ्यांची ऑनलाइन विक्री

दौड तालुक्यातील नानगाव येथील एका महिला बचत गटातील महिलांनी 'लोकल टू ग्लोबल'चा अवलंब केला आहे. त्यांनी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांची Amazon वर ऑनलाइन विक्री केली आहे.

    दौंड, 27 एप्रिल: पूर्वी घरोघरी इंधन म्हणून शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जायचा. पण अलीकडच्या काळात शेणाच्या गोवऱ्या इंधन वापरण्याची पद्धत लोप पावताना दिसत आहे. सध्या ग्रामीण भागातही लोकांच्या घरी गॅस कनेक्शन आलं आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी गोवऱ्याचा वापर इंधन म्हणून करण्याची पद्धत बंद होतं चालली आहे. असं असताना दौंड तालुक्यातील नानगाव येथील काही महिलांनी मात्र शेण्याच्या गोवऱ्या विकण्यासाठी जागतिक प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. पुणे जिल्ह्याच्या दौड तालुक्यातील नानगाव येथील एका महिला बचत गटाच्या महिलांनी 'लोकल टू ग्लोबल'चा अवलंब केला आहे. संबंधित महिला बचत गटाने गायीच्या शेणापासून गोवऱ्या तयार करून त्या अॅमेझॉन सारख्या आंतराष्ट्रीय व्यासपीठावर विकायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला आता चांगला प्रतिसादही मिळत आहेत. त्यांच्या गोवऱ्यांना तेलंगणा सारख्या परराज्यातूनही मागणी वाढत आहे. दैनिक प्रभातने दिलेल्या वृत्तानुसार, दौंड तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आश्लेषा शेलार यांनी पुढाकार घेऊन पाच वर्षांपूर्वी या महिला बचत गटाची स्थापना केली होती. आश्लेषा शेलार यांनी सुरू केलेल्या श्री महिला बचत गटाचा व्यावसाय मागील काही काळात जेमतेम सुरू होता. पण त्यांनी लोकल टू ग्लोबल होण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या थापून त्याची ऑनलाइन विक्री करण्याचं ठरवलं. यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायाची अॅमेझॉनवर नोंद केली. सध्या त्यांच्या गोवऱ्यांना चांगलीच मागणी वाढली असून प्रत्येक 15 रुपयांना एक गोवरी विकली जात आहे. हे वाचा-'हापूस' खरेदी करताय मग एकदा हे वाचाच, देवगडच्या नावाने विकला जातोय कर्नाटकी आंबा संबंधित महिला बचत गटाने सुरुवातीच्या काळात मसाल्याचे पदार्थ, शेवया बनवणे, लोणचं तयार करणं यासारखे अनेक व्यावसाय केले. त्यानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच शेणापासून गोवऱ्या बनवून अशा पद्धतीनं विक्री केली आहे. त्यांच्या या नवीन व्यावसायाला मिळणारा प्रतिसाद पाहून गावातील इतर महिलाही या व्यावसायाकडे आकर्षित होतं आहेत. दुसरीकडे अशाप्रकारच्या उपक्रमामुळे गृहिणींना रोजगारही उपलब्ध होतं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amazon, Pune news

    पुढील बातम्या