पुण्यात डॉक्टर महिलेला केले ब्लॅकमेल.. लॉजवर बलात्कार करून बनवला अश्लील व्हिडीओ

नराधमाने पीडितेला लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिच्यासोबत शरीरसंबंध व अनैसर्गिक कृत्य केले.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 12:43 PM IST

पुण्यात डॉक्टर महिलेला केले ब्लॅकमेल.. लॉजवर बलात्कार करून बनवला अश्लील व्हिडीओ

पुणे, 31 जुलै- डॉक्टर महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करून मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन नराधमाने पीडितेला ब्लॅकमेलही केले. नराधमाने पीडितेला लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिच्यासोबत शरीरसंबंध व अनैसर्गिक कृत्य केले.

काय आहे हे प्रकरण..?

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी 30 वर्षीय पीडित डॉक्टर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रवींद्र लसणे (वय 30, रा. उलवेगाव, नवी मुंबई) व दीपक पाटील (रा. मोरेवस्ती, चिखली) या दोन आरोपींविरूद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला माफी मागण्याचे कारण सांगून लॉजवर घेऊन जाऊन गुंगीचे औषध देऊन आरोपीने फिर्यादी महिलेवर अत्याचार केला. त्याचे मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ काढला. सन 2010 पासून हा प्रकार सुरू होता. तब्बल नऊ वर्षे आरोपींनी पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, रविवारी (28 जुलै) रात्री दोन्ही आरोपी पैसे घेण्यासाठी आले. त्यांनी पुन्हा धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केला. अखेर पीडितेने या अत्याचाराला कंटाळून पोलिसांत धाव घेतली.

पती-मुलांना जिवे मारण्याची धमकी..

महिलेने नकार दिला असता व्हिडीओ पती व सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच पती, तिला व मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध व अनैसर्गिक कृत्य केले. दरम्यान,एकाच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यासाठी 4 लाख रुपये घेतल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले.

Loading...

वर बलात्कार करून बनविला अश्लील व्हिडीओ, ब्लॅकमेलही केले

VIDEO :..तेव्हा शिवसेना कशी फोडली? चंद्रकांत पाटलांचं पवारांना जशास तसे उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2019 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...