मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'गोट्या खेळू नका' म्हटल्याच्या रागातून पुण्यात महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

'गोट्या खेळू नका' म्हटल्याच्या रागातून पुण्यात महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दंगा करीत गोट्या खेळणाऱ्यांना 'इथं खेळू नका' असं सांगणाऱ्या महिलेसह तिच्या दोन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. तक्रारदार महिलेच्या सोसायटीसमोर संबंधित चारही आरोपी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोट्या खेळत होते.

पुणे, 3 जून : क्षुल्लक कारणावरून महिलेसह (Woman Beaten) तिच्या दोन मुलांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा (Kondhva) येथे घडला आहे. या प्रकरणी 38 वर्षीय महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime news) कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात घडला आहे.

दंगा करीत गोट्या खेळणाऱ्यांना 'येथे खेळू नका' असं सांगणाऱ्या महिलेसह तिच्या दोन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. तक्रारदार महिलेच्या सोसायटीसमोर संबंधित चारही आरोपी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गोट्या खेळत होते. खेळताना त्यांचा चांगलाच दंगा सुरू होता. त्यावर तक्रारदार महिलेनं 'येथे खेळू नका,' असे त्या चौघांना सांगितलं. मात्र, त्याचा राग आल्यानं आरोपींनी तक्रारदार महिलेस त्यांच्या दोन मुलांना शिवीगाळ करून दगडानं आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.

या प्रकारामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. गोट्या खेळण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर महिलेला आणि तिच्या मुलांना जबर मारहाण केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पुण्यात गुन्हेगारीवर आळा मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत, मात्र तरीही अशा घटना समोर येत आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू आहेत. या काळात जवळपास सर्वजणच घरात आहेत. त्यामुळं घरातील वादांची प्रकरणे वाढल्याचे सांगण्यात येत आहेत. घरात नवरा-बायकोंच्या भांडणांचे प्रमाण वाढले आहे, अशाही बातम्या समोर आल्या आहेत. या घटनेतील संबंधित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या चौघांचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

हे वाचा - Lockdown की Unlock? अनलॉकची घोषणा करून वडेट्टीवार नागपुरात तर जनता संभ्रमात

दरम्यान, पुण्यात कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं कमी होत असल्यानं दिलासादायक स्थिती आहे. पुण्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट जवळपास आटोक्यात आल्याची स्थिती आहे. दरदिवशी सापडणाऱ्या रुग्णांसह मृतांच्या संख्येतही घट झाली आहे.

First published:

Tags: Pune, Pune crime, Pune crime news