मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणेकरांना आता एका क्लिकवर मिळणार घरकाम करणाऱ्या मावशी; नव्या Startup ची कमाल

पुणेकरांना आता एका क्लिकवर मिळणार घरकाम करणाऱ्या मावशी; नव्या Startup ची कमाल

कोरोना विषाणूच्या (corona virus) संकटकाळात घरकाम (Housework) करणाऱ्या अनेक महिला कामगारांची (Woman Maid) होरपळ झाली आहे. कोरोनाच्या भीतीनं अनेकांनी घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी दिली आहे. पण या नव्या स्टार्टअपनं त्यांना आधार दिला आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 19 जून: कोरोना विषाणूच्या (corona virus) संकटकाळात घरकाम (Housework) करणाऱ्या अनेक महिला कामगारांची (Woman Maid) होरपळ झाली आहे. कोरोनाच्या भीतीनं अनेकांनी घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी दिली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगार (Unemployed) होण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे घरकाम करणाऱ्या महिला कोरोना विषाणूबाबत योग्य काळजी घेतात की नाही? यामुळे अनेकजण भयभीत झाले आहेत. या दोन्ही बाजूंची समस्या लक्षात घेऊन पुण्यातील एका दाम्पत्यानं अनोखं स्टार्टअप सुरू केलं आहे. त्यामुळे अनेक असंघटीत कामगार महिलांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. सोबतच शहरातील शेकडो लोकांना कोरोना प्रादुर्भावाबद्दल योग्य माहिती असणारी महिला घरकामासाठी उपलब्ध झाली आहे. कोरोना काळात घरकाम करणारी मावशी योग्य काळजी घेतात का? कोरोनाबाबतची साफसफाई त्यांना करता येते का? तसेच मावशींना कोरोना तर नाही ना? अशा अनेक समस्या नागरिकांना पडत आहेत. अशा सर्व समस्यांचं उत्तर पुण्यातील या स्टार्टअपनं दिलं आहे. तसेच घरकाम करणाऱ्या या असंघटित महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. 20 वर्षांहून अधिक काळ आयटी क्षेत्रात सल्लागार पदावर काम केल्यानंतर मंदार घुगरी आणि त्यांच्या पत्नी सुनीता घुगरी यांनी गेल्यावर्षी मार्चमध्ये हे अनोखं स्टार्टअप सुरू केलं आहे. या स्टार्टअपचं नाव मेड इझी (maideasy) असं आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून घुगरी यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 100 हून अधिक नागरिकांना महिला घरकामगार पुरवली आहे. तर आत्तापर्यंत 200 हून अधिक महिलांनी या स्टार्टअपमध्ये स्वतःची नाव नोंदणी केली आहे. हेही वाचा-Rain Updates: जाणून घ्या कशी आहे आज राज्यातल्या पावसाची परिस्थिती या स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक घरकामगार महिलांना संघटित करण्याच काम सुरू आहे. त्याचबरोबर घरकाम करण्यापासून कामाच्या ठिकाणी कसं वागावं, याचं प्रशिक्षणही कंपनीकडून देण्यात येत आहे. तसेच कामावर रुजू होण्यापूर्वी संबंधित महिला कामगाराची वैद्यकीय तपासणी केली जाते. गरज पडल्यास संबंधित महिलेची महिलेची पोलिसांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील तपासली जाते. किती आणि काय काम आहे, त्यानुसार महिलांना पगार पुरवला जातो. अशा महिला कामगारांमुळे अनेक नागरिकांची कोरोना बाबतची धास्ती कमी झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Startup

    पुढील बातम्या