मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा कांड; पहिलं लग्न होऊनही महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत घरोबा

पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा कांड; पहिलं लग्न होऊनही महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत घरोबा

Crime in Pune: पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार (woman police officer sexual harassment) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 29 ऑक्टोबर: पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार (woman police officer sexual harassment) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 33 वर्षीय पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाविरोधात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे. आरोपीने 2013 पासून पीडितेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. खडकी पोलिसांनी आरोपी पोलीस निरीक्षकाविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

हरीश सुभाष ठाकूर असं गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव असून त्यांची पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी ठाकूर याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याची खोटी माहिती देऊन पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत विवाह केला होता. लग्नानंतर फिर्यादीने सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. फिर्यादी महिला या पुण्यातच पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

हेही वाचा-विवाहितेच्या कौटुंबीक वादातून साधला डाव; ससूनमधील तोतया डॉक्टरकडून तरुणीवर रेप

आरोपीनं पोलीस अधिकाऱ्याने पाच वर्षाच्या मुलासमोर फिर्यादीसोबत वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोपी पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे. याशिवाय 2015 साली मुंबई येथील घरी असताना, आरोपीनं फिर्यादीला जीवे मारण्याच्या हेतूने तिच्यावर गोळी झाडल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. गोळीबाराच्या या घटनेत फिर्यादीत्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा-मध्यरात्री मुंबईत रंगला सायको किलरचा थरार; 15मिनिटात दगडाने ठेचून दोघांना संपवलं

आरोपीच्या दबावाला घाबरून पीडित महिला अधिकारी इतके दिवस तक्रार देत नव्हती. पण अलीकडेच आरोपीनं लग्नाची नोंदणी करण्यास टाळाटाळ केल्याने पीडित महिलेनं खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. खडकी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune